आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Rana Daggubati Will Produce The Biopic Of Cricketer Muthaiya Muralitharan, Vijay Setupati To Play Lead Role

क्रिकेटर मुथैया मुरलीधरनचा बायोपिक प्रोड्यूस करणार आहे राणा दग्गुबती, विजय सेतुपती साकारणार आहे मुख्य भूमिका 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : बाहुबली फेम राणा दग्गुबती आपल्या होम प्रोडक्शन सुरेश प्रोडक्शनच्या अंतर्गत क्रिकेटवर एक चित्रपट बनवणार आहे. ज्यामध्ये विजय सेतुपती लीड रोल साकारणार आहे. हा चित्रपट श्रीलंका क्रिकेट टीमचा लेग स्पिनर मुथैया मुरलीधरनचा बायोपिक असेल. या चित्रपटाची घोषणा मंगळवारी झाली.  

 

 

डिसेंबरपासून सुरु होणार आहे शूटिंग... 
बॉलिवूड लाइफच्या बातमीनुसार, राणाने सांगितले की, तो या चित्रपटात विजयला घेऊ खूप उत्साहित आहे. चित्रपटाचे डायरेक्शन एमएस श्रीपती करणार आहे. तसेच चित्रपटाचे प्रोडक्शन राणाव्यतिरिक्त डार मीडिया प्रायव्हेट लिमिटेडदेखील करेल. चित्रपटाचे शूटिंग डिसेंबरपासून सुरु होईल. मात्र अद्याप चित्रपटाचे टायटल फायनल झालेले नाही.  

 

दाखवला जाईल क्रिकेट करियरमधील प्रत्येक पैलू... 
1972 मध्ये कँडीमध्ये जन्मलेल्या स्पिनर मुरलीधरनने 1992 ते 2011 दरम्यान 133 टेस्ट, 350 वनडे आणि 12 T-20 मॅच खेळल्या. तो 1996 मध्ये क्रिकेट वर्ल्डकप जिंकणाऱ्या श्रीलंका टीमच्या प्रमुख खेळाडूंपैकी एक होता. त्याच्या बायोपिकमध्ये सचिन तेंडुलकरचादेखील मुख्य रोल असेल. 

बातम्या आणखी आहेत...