आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Rana Kapoor Yes Bank | Yes Bank Director Rana Kapoor Latest News Updates On Enforcement Directorate (ED) Over Yes Bank Share Price Crisis

येस बँक संचालक राणा कपूर ईडीच्या ताब्यात, रात्री उशीरापर्यंत घरावर धाड; मनी लॉन्ड्रिंगचा खटला

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - येस बँकेचे संचालक राणा कपूर यांना ईडीने चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. तत्पूर्वी कपूरच्या घरावर अंमलबजावणी संचलनालय (ईडी) ने रात्री उशीरा छापा टाकला. बँकचे संस्थापक असलेले कपूरविरुद्ध ईडीने मनी लॉन्ड्रिंगचा खटला दाखल केला आहे. याच संदर्भात ईडीची एक टीम राणा कपूरच्या मुंबईतील समुद्र महल टॉवर येथील घरावर पोहोचली. रात्री उशीरापर्यंत घराची झडती घेण्यात आली. भारतीय रिझर्व्ह बँकेने डबघाईला गेलेल्या येस बँकेच्या ग्राहकांवर केवळ 50 हजारांच्या व्यवहाराची अट टाकली आहे. येस बँकेचे सर्वच व्यवहार पुढील 30 दिवसांसाठी आता रिझर्व्ह बँकेकडे आहेत.

2017 मध्येच मिळाले होते बँक बुडणार असल्याचे संकेत!
येस बँकेच्या परिस्थितीसाठी संस्थापक, माजी व्यवस्थापकी संचालक आणि सीईओ राणा कपूर यांनाच जबाबदार धरले जात आहे. राणा कपूरवर मोठ-मोठ्या उद्योग समूहांना कर्ज देणे आणि त्यांच्याच सोयीनुसार वसूली करण्याचे आरोप आहेत. आपल्या वैयक्तिक संबंधांवरून त्यांनी कर्ज वाटले असाही आरोप आहे. येस बँकेच्या कर्जदारांमध्ये अनिल अंबानी ग्रुप, आयएल अँड एफएस, सीजी पावर, एस्सार पॉवर, रेडिअस डेव्हलपर्स आणि मंत्री ग्रुपसारख्या उद्योग समूहांचा समावेश आहे. या ग्राहकांना डिफॉल्टर (कर्जबुडवे) घोषित केल्यानंतर बँकेवर संकट ओढावले. 2017 मध्ये बँकेने 6,355 कोटी रुपयांची रक्कम बॅड लोन कॅटेगरीमध्ये टाकले होते. तेव्हापासूनच आरबीआयची या बँकेवर करडी नजर होती. 2018 मध्ये आरबीआयने राणा कपूरवर कर्ज आणि बॅलेन्स शीटमध्ये घोळ केल्याचे आरोप केले होते. यानंतर कपूरला चेअरमन पदावरून हटवण्यात आले होते. बँकिंग इतिहासात एका चेअरमनला अशा प्रकारे हटवण्याची ही पहिलीच वेळ होती.