Home | Gossip | ranabir kapoor's 'bramhastra' step back because of salman khan's 'dabangg 3'

कन्फर्म : सलमानची 'दबंग 3' 20 डिसेंबर 2019 ला होणार आहे रिलीज, 'ब्रह्मास्त्र'च्या मेकर्सने पुढे ढकलली रिलीज डेट

दिव्य मराठी वेब टीम  | Update - Apr 28, 2019, 05:29 PM IST

फिल्म डायरेक्टर अयान मुखर्जीने सांगितले की, आता फिल्म 2020 मध्ये होईल रिलीज... 

  • ranabir kapoor's 'bramhastra' step back because of salman khan's 'dabangg 3'

    बॉलिवूड डेस्क : सलमान खानने शुक्रवारी 'दबंग 3' ची रिलीज डेट सांगितली. फिल्म 2019 मध्ये 20 डिसेंबरला रिलीज होणार आहे. सलमानने याबाबत ऑफिशियल अनाउंसमेंट करून इन्स्टाग्रामवर लिहिले, 'चुलबुल परत आला आहे. या फिल्ममध्ये सलमानव्यतिरिक्त सोनाक्षी सिन्हादेखील दिसणार आहेत, जी त्याच्या पत्नीची भूमिका करत आहे. याव्यतिरिक्त फिल्ममध्ये साउथ स्टार सुदीपला व्हिलन म्हणून साइन केले आहे. फिल्मचे डायरेक्टर प्रभु देवा आहेत. फिल्मच्या पहिल्या शूटिंग शेड्यूल मध्य प्रदेशमध्ये झाले आहे आणि आता लवकरच उर्वरित शूटिंगदेखील सुरु केले जाईल.

    'ब्रह्मास्त्र' चित्रपट झाला मागे...

    मजेशीर गोष्ट ही आहे की, क्रिसमसच्या काळात रिलीज होणारी ही फिल्म रणबीर कपूर आणि आलिया भट्टची अपकमिंग फिल्म 'ब्रह्मास्त्र'ने क्लॅशपासून वाचण्यासाठी 'ब्रह्मास्त्र' च्या मेकर्सने रिलीजपासून डेट पुढे ढकलली आहे. फिल्मचे डायरेक्टर अयान मुखर्जीने एका प्रेस रिलीजमध्ये सांगितले की, आता ही फिल्म 2020 मध्ये रिलीज केली जाणार आहे. फिल्ममध्ये रणबीर-आलियाव्यतिरिक्त अमिताभ बच्चनदेखील महत्वाच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शक अयान मुखर्जी आहे.

Trending