आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अंकितचे नाबाद द्विशतक; महाराष्ट्र संघाचा ओडिशासमाेर धावांचा डाेंगर

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - मराठवाड्यातील  औरंगाबादचा​​ युवा फलंदाज अंकित बावणे (नाबाद २०४) अाणि उस्मानाबादच्या नाैशाद शेखने (१००)   गुरुवारी रणजी ट्राॅफीमध्ये आपल्या घरच्या मैदानावर ओडिशाविरुद्ध झंझावाती खेळी केली. यादरम्यान अंकितने नाबाद द्विशतक साजरे केेले. तसेच या दाेघांनी दीडशतकी  भागीदारी रचली. याच्या बळावर यजमान महाराष्ट्र संघाने ओडिशासमाेर धावांचा डाेंगर उभा केला. महाराष्ट्राने  पाच बाद ५४३ धावांवर अापला पहिला डाव घाेषित केला. यामध्ये राहुल त्रिपाठी (६५) अाणि ऋतुराज गायकवाडचे (१२९) माेलाचे याेगदान राहिले.


आता खडतर लक्ष्याच्या प्रत्युत्तरात ओडिशा संघाने दिवसअखेर दुसऱ्या डावात २४ धावा काढल्या. अद्याप २२६ धावांनी पिछाडीवर असलेल्या ओडिशाकडे १० विकेट शिल्लक आहेत. संघाचा सलामीवीर शंतनू मिश्रा (१४) आणि सारंगी (१०) मैदानावर कायम आहेत. या दाेघांनी ११ षटकांत २४ धावांची भागीदारी केली. ओडिशा संघाला आपला पहिला डाव २९३ धावांवर गुंडाळावा लागला. यात महाराष्ट्राकडून अक्षय पालकर (४/८१), मुकेश चाैधरी (२/७९) अाणि सत्यजित बच्छाव (२/७०) यांनी धारदार गाेलंदाजी केली.
महाराष्ट्राची पहिल्या डावात निराशाजनक सुरुवात झाली. सलामीवीर स्वप्निल गुगळे (७) आणि जय पांडे (१७) हे दाेघेही फार काळ आव्हान कायम ठेवू शकले नाहीत. त्यांनी १८ धावांची भागीदारी केली. स्वप्निल ७ धावांची खेळी करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यापाठाेपाठ जय पांडे (१७) बाद झाला. त्यानंतर ऋतुराज गायकवाडने संघाचा डाव सावरला. यासाठी त्याला कर्णधार अंकितची माेलाची साथ मिळाली. या दाेघांनी ओडिशाच्या सुमार गाेलंदाजीचा खरपूस समाचार घेताना तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. यात ऋतुराजने  वैयक्तिक शतक साजरे केले. त्याने २१७ चेंडूंचा सामना करताना १२९ धावांची खेळी केली. दरम्यान, त्याला ओडिशाच्या प्रधानने झेलबाद केले. 

 

नाैशादचे चार वर्षांनंतर शतक 
 
महाराष्ट्राचा माेठा विजय निश्चित करण्याच्या इराद्याने अंकित बावणे व नाैशादने तुफानी फटकेबाजी केली. त्यांनी चाैथ्या विकेटसाठी १८० धावांची भागीदारी केली. यादरम्यान नाैशादने प्रथम श्रेणी करिअरमधील अापले तिसरे  शतक साजरे केले. त्याने चार वर्षांनंतर हा  शतकी  खेळीचा पल्ला गाठला. यापूर्वी त्याने काेलकात्याच्या मैदानावर विदर्भ संघाविरुद्ध शतक ठाेकले हाेते.

अंकितचे द्विशतक साजरे

औरंगाबादच्या युवा अंकित बावणेने तुफानी खेळी करताना प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा तुफानी फटकेबाजी केली. त्याने द्विशतक साजरे केेले. त्याने ४०६ चेंडूंचा सामना करताना नाबाद २०४  धावा काढल्या. यात २१ चाैकार आणि एका षटकाराचा समावेश आहे. यासह त्याने संघाला धावांचा डाेंगर उभा करून दिला. त्याला राहुलचीही माेलाची साथ मिळाली.