आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शूटिंगसाठी मनालीमध्ये पोहोचले रणबीर-आलिया, या अंदाजात झाले कपलचे स्वागत  

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट सध्या मनालीमध्ये आहेत. येथे दोघेही त्यांच्या आगामी 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी पोहोचले. त्यांच्यासोबत अभिनेत्री मौनी रॉयदेखील आहे. मनालीत पोहोचलेल्या रणबीर-आलियाचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. विशेष म्हणजे रणबीरच्या खांद्याला दुखापत झाली असून देखील तो चित्रीकरणासाठी मनालीत दाखल झाला आहे. 

#ranbirkapoor AT MANALI 🔥🔥

A post shared by ranbir kapoor (@ranbir_kapoor_officialll) on

  • अमिताभही पोहोचणार मनालीत...

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन 27 नोव्हेंबर रोजी मनालीत दाखल होणार असून ते रणबीर-आलियासोबत चित्रीकरणाला सुरुवात करतील. सूत्रांच्या माहितीनुसार, प्रकृती अस्वस्थामुळे त्यांना मनालीतील वातावरणाचा त्रास होऊ शकतो, पण चित्रपटाच्या यूनिटने त्यांच्या तब्येतीनुसार चित्रीकरणाची सोय केली आहे. सर्व कलाकार मनालीतील हॉटेल स्पेन रिसॉर्ट या फाइव्ह स्टारमध्ये मुक्कामाला आहेत. 

  • यांच्या आहेत भूमिका...

अयान मुखर्जी 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाचा दिग्दर्शक आहे. यात आलिया आणि रणबीरसह अमिताभ बच्चन, डिंपल कपाडिया, मौनी रॉय आणि नागार्जुन यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.  पुढील वर्षी उन्हाळ्यात हा चित्रपट रिलीज होणार असल्याची चर्चा आहे. 

बातम्या आणखी आहेत...