आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

RK स्‍टूडिओच्‍या अखेरच्‍या बाप्‍पाचे विसर्जन; रणबीर, ऋषि कपूर झाले मिरवणुकीत सहभागी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- 70 वर्षे जुन्‍या RK स्‍टूडिओमध्‍ये नेहमीप्रमाणे यंदाही गणपतीची स्‍थापना करण्‍यात आली. 10 दिवसांच्‍या गणेशोत्‍सवानंतर आज (रविवारी) अनंत चतुर्दशीच्‍या दिवशी येथील गणपतीचेही विसर्जन करण्‍यात आले. मात्र यंदाचे विसर्जन RK स्‍टूडिओचे अखेरचे गणपती विजर्सन असणार आहे. कारण कपूर फॅमिलीने या स्‍टूडिओचीच विक्री करण्‍याचा निर्णय घेतला असल्‍याचे वृत्‍त आहे. अखेरच्‍या या विसर्जन मिरवणुकीत रणबीर कपूर, ऋषि कपूर, रणधीर कपूर आणि राजीव कपूर सहभागी झाले होते.


रणबीला पाहताच फॅन ओरडले, संजू...मुन्‍नाभाई
विसर्जन मिरवणुकीत रणबीर कपूरला पाहताच त्‍याचे फॅन संजू, मुन्‍नाभाई म्‍हणून त्‍याला हाक मारत होते. यादरम्‍यान रणबीरने बाप्‍पासमोर नारळही फोडले. तर रणबीर कपूरचे काका राजीव कपूर व वडील ऋषि कपूर मिरवणुकीत ढोल ताशांच्‍या तालावर नाचताना दिसून आले.  

 

मीडिया रीपोर्ट्सनूसार, राज कपूर यांच्‍या पत्‍नी कृष्‍णा राज कपूर यांनी मुल रणधीर कपूर, ऋषि कपूर आणि मुली रितू नंदा, रीमा जैन यांच्‍यासोबत मिळून आरके स्‍टूडिओची विक्री करण्‍याचा निर्णय घेतला आहे. रणधीर कपूर यांनी एका मुलाखतीत सांगितले की, सप्‍टेंबर 2017मध्‍ये स्‍टूडिओमध्‍ये आगीची दुर्घटना घडल्‍यानंतर स्‍टूडिओचे प्रचंड नुकसान झाले होते. त्‍यांनंतर या स्‍टूडिओच्‍या मेंटेन्‍सला फार खर्च येत असल्‍याने कुटुंबियांनी या स्‍टूडिओची विक्री करण्‍याचा निर्णय घेतला.

 

 

 

बातम्या आणखी आहेत...