आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऐकलंत का...  यावर्षी कपूर आणि भट कुटुंबात वाजणार सनई चौघडे  \'ब्रह्मास्त्र\'च्या रिलीजपूर्वी रणबीर-आलियाचा होणार साखरपुडा! 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या वर्षी बॉलिवूडमध्ये लग्नाची धूम होती. प्रियांका चोप्रा आणि दीपिका पदुकोणसह अनेक मोठे तारे 2018 मध्ये लग्नाच्या बंधनात अडकले. नवीन वर्षांतदेखील बॉलिवूडमध्ये सनई चौघड्यांचे सूर ऐकू येणार आहेत. यावर्षी रणबीर कपूर आणि आलिया भट लग्न करणार असल्याची बातमी आहे. रणबीरची आई नीतू सिंहचे म्हणणे आहे की, 'ब्रह्मास्त्र'च्या रिलीजपूर्वी दोघांनी साखरपुडा करुन घ्यावा. चित्रपटाच्या रिलीजनंतर म्हणजेच वर्षांच्या शेवटी दोघे लग्न करतील, अशी चर्चा आहे. रणबीर नेहमी आपल्या आईचे ऐकतो असे बोलले जाते, तर आलियादेखील लग्नासाठी उत्साहित आहे. आता हे दोघे आपल्या लग्नाची अधिकृत घोषणा कधी करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 

बातम्या आणखी आहेत...