आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएंटरटेन्मेंट डेस्क : फिल्मफेयर अवॉर्ड्स 2019 चे आयोजन शनिवारी रात्री जियो गार्डनमध्ये केले गेले होते. इव्हेंट्सशी निगडित अनेक फोटोज आणि व्हिडीओज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यातील एक खूप मजेदार फोटो समोर आला आहे, ज्यामध्ये रणबीर कपूर, विक्की कौशलसोबत लिपलॉक करताना दिसत आहे. झाले असे की, अवॉर्ड्समध्ये जेव्हा बेस्ट अॅक्टरसाठी रणबीर कपूरचे नाव घेतले गेले तेव्हा तो खूप एक्साइटेड झाला. पहिले तर त्याने आलिया भट्टसोबत लिपलॉक केले आणि मग बाजूला बसलेल्या विक्की कौशललाही किस केले. हे पाहून आलिया आपले हसू रोखू शकली नाही. विक्की-रणबीर यांचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विक्कीने हा फोटो आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर देखील शेयर केला आहे. यावर त्याने कॅप्शन लिहिले, 'Goals AF!'.
- विक्कीला फिल्म 'संजू' साठी बेस्ट सपोर्टिंग अॅक्टरचा अवॉर्ड मिळाला आहे. अवॉर्ड मिळाल्यानंतर रणबीर-विक्की आणि बाकीच्या सेलेब्सने जोरदार पार्टी केली.
- विक्कीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर तो सध्या हॉरर फिल्मची शूटिंग करत आहे. त्याची अपकमिंग फिल्म 'तख्त' आहे, ज्यामध्ये तो आलिया भट्टसोबत दिसणार आहे. धर्मा प्रोडक्शनच्या या फिल्ममध्ये करीना कपूर, रणवीर सिंह, जाह्नवी कपूर यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.