आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Ranbir Kapoor Was Injured During The Shooting Of 'Brahmastra', The Fan Tweeted, 'What Happened To My Ranno's Hand'?

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'ब्रह्मास्त्र'च्या शूटिंगदरम्यान रणबीर कपूर जखमी, फॅनने ट्वीट करून विचारले, 'काय झाले माझ्या रन्नोच्या हाताला'

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : आगामी चित्रपट 'ब्रह्मास्त्र' साठी शूट करत असलेल्या रणबीर कपूरचा अपघात झाला आहे. शूटदरम्यान रणबीरच्या हाताला इजा झाली आहे. अभिनेत्याला जखम झाल्याची गोष्ट कळताच फॅन्सने प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. सांगितले जाते आहे की, जखम झाल्यानंतरही अभिनेत्याने बाकीचे शुटिंग पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. रणबीर अशातच मनालीवरून शूट संपवून परतला आहे. 


रणबीरच्या हाताला जखम झाल्यामुळे रणबीर कपूरचे फॅन्स दुखी झाले आहेत. त्याचा फॅनबेस एवढा मोठा आहे की, बातमी
बाहेर येताच रणबीर कपूर हॅशटॅग ट्रेंड करू लागले आहे आणि यावर सुमारे दीड हजार ट्वीट केले गेले आहेत. 

एका फॅनने लिहिले की, 'काय झाले, रणबीर काळजी घे आणि लवकर बरा हो.' तर एका यूजरने एअरपोर्टवर आलिया आणि अभिनेत्याचे फोटो शेअर करून लिहिले, 'आरके लवकर ठीक हो.' रणबीरच्या आणखी एका फॅनने त्याच्या तांबेयतीबद्दल काळजी व्यक्त केली, लिहिले, 'आल्लाह काय झाले माझ्या रन्नोच्या हाताला, हनी लवकर ठीक हो.' 

धर्मा प्रोडक्शनच्या बॅनरखाली बनत असलेला चित्रपट 'ब्रह्मास्त्र' च्या शूटिंगसाठी मनालीची काही स्थळे निवडली गेली आहेत. दोन आठवडे रोहतांगच्या घाटांमध्ये सोलंगनाला, गुलाबा, हामटा, नग्गर व रायसन यांसारख्या ठिकाणी शूटिंग केले गेले. आयान मुखर्जी या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. हा चित्रपट पुढच्यावर्षी रिलीज होईल.