Home | Gossip | Ranbir Kapoor's fan touches his legs, social media users angry with actor's behavior

अचानक येऊन रणबीर कपूरच्या पाया पडला एक फॅन, अभिनेत्याचे वर्तन पाहून भडकले सोशल मीडिया यूजर्स

दिव्य मराठी वेब, | Update - Jun 09, 2019, 04:47 PM IST

"कमीत कमी त्याला वर बस तरी म्हणायचे होते." - एक युजर...  

 • Ranbir Kapoor's fan touches his legs, social media users angry with actor's behavior

  बॉलिवूड डेस्क : रणबीर कपूर सध्या वाराणसीमध्ये आपला अपकमिंग चित्रपट 'ब्रह्मास्त्र'चे शूटिंग करत आहेत. यादरम्यान तो फॅन्सला भेटत आहे. त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक फॅन त्याच्या पाया पडताना दिसत आहे. पण त्यामुळे सोशल मीडियावर त्याला खूप ट्रोल केले जात आहे.

  रणबीरचे वर्तन पाहून भडकले सोशल मीडिया यूजर्स...
  झाले असे की, रणबीरच्या रूममध्ये येऊन जेव्हा एक फॅन त्याच्या पाया पडतो तेव्हा तो त्याला घेऊन सिटिंग एरियामध्ये जातो आणि स्वतः सोफ्यावर बसतो. फॅन मात्र त्याच्या जवळच खाली जमिनीवर बसतो आणि दोघे बोलू लागतात. पण अनेक सोशल मीडिया यूजर्सने याबद्दल राग व्यक्त केला की, रणबीरने आपल्या फॅनला सोफ्यावर बसदेखील म्हणला नाही.

  सोशल मीडियावर येत आहेत अशा कमेंट्स...
  - "रणबीर देव आहे का ? का तो आपल्या फॅनला काउचवर बसदेखील म्हणला नाही."
  - "रणबीर खूपच रूड आहे. एकदाही वर बस नाही म्हणाला त्याला. या गाढवाला पण त्याचाच फॅन बनायचे होते."
  - "कमीत कमी त्याला वर बस तरी म्हणायचे होते."
  - "त्यांचा सन्मान करायला शिक, ज्यांनी तुला प्रसिद्धी दिली आहे, कमीत कमी चांगला कलाकार तरी बन."

  अयान मुखर्जीच्या डायरेक्शनमध्ये बनत असलेला हा चित्रपट पुढच्यावर्षी रिलीज होणार आहे. चित्रपटात रणबीरसोबत अमिताभ बच्चन, आलिया भट्ट, डिंपल कपाड़िया आणि मौनी रॉयदेखील आहेत.

Trending