• Home
  • Ranchi girl tattooed Modiji's tattoo on her back to rejoice Section 370 cancellation

रोचक / कलम 370 रद्द झाल्याच्या आनंदात रांचीच्या एका तरुणीने आपल्या पाठीवर बनवला मोदीजींचा टॅटू 

मी माझ्या पाठीवर पंतप्रधानांचे टॅटू बनवून आनंद साजरा करत आहे - रिधी

दिव्य मराठी वेब

Sep 19,2019 12:17:43 PM IST

एंटरटेन्मेंट डेस्क : जम्मू-काश्मीरमधून कलम 370 रद्द झाल्याच्या आनंदात झारखंडच्या एका तरुणीने आपल्या पाठीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा टॅटू बनवला आहे. 21 वर्षांची ही तरुणी रांचीमध्ये राहते. तिचे नाव रिधी शर्मा आहे. रिधी म्हणाली, "मी सुरुवातीपासून पीएम मोदी यांची समर्थक आहे. ते खूप मेहनत करतात. जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवणे आणि तीन-तलाकला अपराध बनवणे हे साहसी निर्णय आहेत."

रिधीने सांगितले की, "सर्वांची आनंद साजरा करण्याची आपापली पद्धत असते. मी माझ्या पाठीवर पीएम मोदींच्या फोटोचे टॅटू बनवून आनंद साजरा करत आहे." रांचीच्या लालपुरमधील हे टॅटू बनवणारा विनय कुमार म्हणाला, "हे टॅटू बनवण्यासाठी सहा तासांचा वेळ लागला."

X
COMMENT