Home | Sports | From The Field | Ranchi is doing very well by left-wing spinners

डावखुऱ्या फिरकी गोलंदाजांकडून महेंद्रसिंग धोनी करतोय रांचीत जोरदार सराव

प्रतिनिधी | Update - Nov 08, 2018, 09:53 AM IST

क्रिकेटपटूंची चौकशी करण्याची मागणी केल्यानंतर संशय अधिक गडद होत चालला आहे.

 • Ranchi is doing very well by left-wing spinners

  मुंबई - भारतीय क्रिकेट संघाचा ‘करिष्मेबाज’ माजी कप्तान महेंद्रसिंग धोनी संपला काय? भारतीय संघातून डच्चू मिळाल्यानंतर तर या अफवांना उधाण आले आहे. त्या पार्श्वभूमीवर बीसीसीआय प्रशासकांनी सर्वोच्च न्यायालयाकडे मुदगल समितीने संशयित म्हणून दिलेल्या क्रिकेटपटूंची चौकशी करण्याची मागणी केल्यानंतर संशय अधिक गडद होत चालला आहे. प्रत्यक्षात मात्र सध्या वेगळेच घडतेय. महेंद्रसिंग धोनी याला वगळले नाही तर भावी यष्टिरक्षकांना पूर्णपणे पडताळून पाहण्याची संधी कप्तान व निवड समितीला मिळावी यासाठी धोनीने स्वत:च संघापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. तो निर्णय त्याने निवड समितीच्या गळीही उतरवला.


  महेंद्रसिंग धोनी सध्या रांचीमध्ये डावखुऱ्या फिरकी गोलंदाजांना गोळा करून फलंदाजीचा कसून सराव करतोय. डावखुरा फिरकी गोलंदाज शहाबाज नदीम आणि १९ वर्षांखालील डावखुऱ्या फिरकी गोलंदाजांना धोनीने रांचीत एकत्र केले आहे. त्यांच्याविरुद्ध तो फलंदाजीचा सराव करतोय. २०१९चा विश्वचषक खेळणे हे धोनीचे अंतिम ध्येय आहे. मात्र त्या ध्येयाची पूर्ती करताना आपण संघावर ‘बोजा’ झालो नव्हतो हेही त्याला सिद्ध करायचे आहे. अलीकडे डावखुऱ्या फिरकी गोलंदाजीचा सामना करताना धोनीला फारच अडचण येत होती.


  त्यामुळे त्याच्या फटकेबाजीला आळा बसला होता. नेहमीचा धोनी आपल्याला त्यामुळे पाहावयास मिळाला नव्हता. ‘ग्रेट फिनिशनर’ असलेल्या धोनीला अलीकडच्या सामन्यात धावांचा वेग राखता आला नव्हता. त्याची अडचण डावखुऱ्या फिरकी गोलंदाजांनी केली होती. त्यामुळे धोनी संपला असा सर्वांचा समज व्हायला लागला आहे.

  अाता वनडेत दाखवणार चमक
  धोनीनेच अाता तो गैरसमज दूर करण्यासाठी स्वत: मनावर घेतले आहे. त्याचे यष्टिरक्षण पूर्वीप्रमाणेच चपळ व दक्ष आहे. त्यामुळे यष्टिरक्षक धोनीबाबत कुणालाही आक्षेप नाही. मात्र त्याला धावा वेगात काढणे सध्या जमत नाही, ही तक्रार आहे. असे जरी असले तरीही धोनीने स्वत:हून निवड समितीला सांगून विंडीजविरुद्ध मालिकेत स्वत:ची निवड न करण्याची विनंती केली होती. विश्रांती घेऊन पूर्वतयारीनिशी आता धोनी पुन्हा मैदानात उतरणार आहे. त्याला ५० षटकांच्या सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड दौऱ्यातही आपली चमक दाखवायची आहे आणि त्यानंतर सन्मानाने, इंग्लंडमधील विश्वचषकात खेळून पुढील वर्षी अलविदा करायचा आहे.

  ‘त्या’त नावाची अफवा
  चेन्नई सुपरकिंग्जचा कप्तान असलेल्या धोनीकडे संशयाची सुई रोखल्याची चर्चा होती. ‘त्या’ बंद लिफाफ्यातील १३ जणांकडे धोनीचेही नाव असल्याची आवई त्या वेळी उठली होती. प्रशासकांची त्या क्रिकेटपटूंच्या चौकशीची मागणी आणि धोनीचे स्वत:हून संघाबाहेर जाणे हा निव्वळ योगायोग समजावा का? यावरून सध्या जाेरदार चर्चाही रंगत अाहे. मात्र, याकडे अद्याप लक्ष देत नसल्याचे सांगितले.

Trending