आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Randeep Hooda In Hollywood Hooda Makes His Hollywood Debut With Netflix Film Extraction

अभिनेता रणदीप हुडाची हॉलिवूडमध्ये एंट्री, नेटफ्लिक्सचा 'एक्सट्रॅक्शन' असेल पहिला चित्रपट

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः अभिनेता रणदीप हुडा अलीकडेच दिग्दर्शक इम्तियाज अलींच्या ‘लव्ह आज कल’ या चित्रपटात दिसला होता. आता लवकरच तो नेटफ्लिक्सच्या 'एक्सट्रॅक्शन' या चित्रपटाच्या माध्यमातून हॉलिवूडमध्ये प्रवेश करणार आहे. या चित्रपटातील त्याचा फर्स्ट लूकदेखील समोर आला असून यामध्ये तो हातात गन धरलेला दिसत आहे. रणदीपच्या म्हणण्यानुसार, त्याला चित्रपटात जबरदस्त  अॅक्शन करण्याची संधी मिळाली आहे. तथापि, आत्तापर्यंत बर्‍याच चित्रपटांमध्ये नाट्यमय भूमिका केल्याने त्याला या चित्रपटात अ‍ॅक्शन करण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागले.


आपल्या हॉलिवूड डेब्यूबद्दल बोलताना रणदीपने सांगितले की, 'मला या चित्रपटात बरेच अ‍ॅक्शन सीन्स करायला मिळाले. हॉलिवूड चित्रपटात अॅक्शन पॅक असलेली भूमिका करणारा मी बहुतेक पहिला भारतीय पुरुष अभिनेता असू शकतो. हेम्सवर्थ, रूसो ब्रदर्स आणि दिग्दर्शक सॅम हाग्रेव्ह यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव खूप चांगला होता.'

दिवसातून दोनदा रिहर्सल करावी लागली

आपल्या भूमिकेविषयी रणदीप म्हणाला, 'पटकथामध्ये त्याचे वर्णन विध्वंसक व्यक्तीच्या रुपात करण्यात आले आहे. जो आधी सैन्यात नोकरी करायचा आणि मग ओबीच्या वडिलांसाठी काम करायला लागला. ' तो पुढे म्हणाले, 'मी आतापर्यंत बर्‍याच चित्रपटांमध्ये फक्त नाट्यमय भूमिका केल्या आहेत, चित्रपटाच्या अॅक्शन सिक्वेन्ससाठी मला दहा दिवस दिवसातून दोनदा सराव करावा लागला.' चित्रपटाच्या दिग्दर्शकाचे कौतुक करताना तो म्हणाले, "मला एक गोष्ट नक्की सांगू इच्छितो की, मी आजवर असा दिग्दर्शक  पाहिला नाही जो माझ्या शेजारी वायरवर लटकून दिग्दर्शन करतो."

ख्रिस हेम्सवर्थ मुख्य भूमिकेत आहे

या चित्रपटात हॉलिवूड स्टार ख्रिस हेम्सवर्थ मुख्य भूमिकेत आहे. एवेंजर्स एंडगेम फेम रुसो ब्रदर्सच्या जोडीपैकी जो जो रूसोने चित्रपटाची पटकथा लिहिली आहे. सॅम हाग्रेव्ह यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला असून दिग्दर्शक म्हणून त्यांचा हा पहिलाच चित्रपट आहे. 'एक्सट्रॅक्शन' 24 एप्रिल 2020 रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होईल. या चित्रपटाशिवाय रणदीप आगामी ‘राधे’ या चित्रपटात नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे. जो ईद 2020 रोजी रिलीज होईल. या चित्रपटात सलमान खान आणि दिशा पाटणी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. 

बातम्या आणखी आहेत...