आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Rangoli Chandel Said, 'another World Will Give Proper Justice' Vikas Bahal Gets Clean Chit From Rape Case

विकास बहलला क्लीन चिट मिळाल्यामुळे भडकली रंगोली, म्हणाली - 'या नाही तर दुसऱ्या जगात होईल तुझा न्याय' 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : रिलायंस एंटरटेनमेंटच्या इंटरनल इंक्वायरीमध्ये सेक्सुअल हरेसमेंटचा आरोप झालेला 'क्वीन' चित्रपटाचा डायरेक्टर विकास बहलला क्लीन चिट मिळाली आहे. पण यामुळे कंगना रनोटची बहीण रंगोली चंदेल खूप नाराज आहे. रंगोलीने या निर्णयाविरुद्ध ट्विटरवर ट्वीट्सचा जणू माराच केला आहे. 

 

दुसऱ्या जगात होईल तुझा न्याय - रंगोली... 
रंगोलीने आपल्या ट्वीट्समध्ये आलोक नाथलादेखील खेचले. अलोकनाथवरदेखील मागच्यावर्षी मीटू मूव्हमेंटद्वारे लैगिक शोषण केल्याचा आरोप लागला होता. सध्या ते जामिनावर बाहेर आहेत. मीटू मूव्हमेंटमुळे दोन्ही सेलेब्रिटींवर निशाणा साधत रंगोली चंदेल म्हणाली की, तुमचा सर्वांचा दुसऱ्या जगात न्याय होईल. या जगाव्यतिरिक्तही एक जग आहे जेथे महिलांचे रडणे ऐकून त्यांना न्याय दिला जातो. 

 

रंगोलीने ट्विटरवर शेअर केला रिपोर्ट.... 
रंगोलीने ट्विटरवर एक रिपोर्ट शेअर करून सांगितले, 'आलोक नाथनंतर आता विकास बहललादेखील क्लीन चिट मिळाली आहे. ज्या मुलींनी सेक्सुअल हरासमेंटविरुद्ध आवाज उठवला होता त्या आता आयुष्यभर शरमेने जगातील. या जगाच्या पाठीवर बॉलिवूड एक घाणेरडी जागा आहे.'

बातम्या आणखी आहेत...