आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Rangoli Chandel Said To Tapsi Pannu A Cheap Copy ', Anurag Kashyap Came To Support Tapasi

तापसी पन्नूला 'स्वस्त कॉपी' म्हणाली रंगोली चंदेल, अनुराग कश्यपने दिले रंगोलीला सडेतोड उत्तर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : कंगनाची बहीण रंगोली ट्विटरवर खूप सक्रिय असते. मागच्या बऱ्याच काळापासून रंगोली बॉलिवूडच्या अनेक कलाकारांना कोणत्या ना कोणत्या कारणावरून सुनावत आहे. ट्विटरवर आपल्या वक्तव्यांमुळे ती ती नेहमीच वादनामध्ये असते आणि आता तिचे नाव आणखी एकदा चर्चेत आले आहे. रंगोली चंदेलने यावेळी तापसी पन्नूला निशाणा बनवले आहे. बुधवारी जेव्हा कंगना रनोटचा चित्रपट 'जजमेंटल है क्या'चा ट्रेलर रिलीज झाला तेव्हा फॅन्सप्रमाणे तापसी पन्नूनेदेखील तो पहिला. तापसीला हा ट्रेलर आवडला आणि तिने ट्विटरवर कंगनाच्या चित्रपटाच्या ट्रेलरचे कौतुक केले. तापसीने आपल्या ट्विटरवर लिहिले, 'हे खूपच कूल आहे !!!! यांच्याकडून नेहमीच जास्त अपेक्षा होत्या आणि पूर्णपणे पैसा वसूल आहे!'

 

 

तापसीला कौतुकाच्या बदल्यात मिळाले असे काही... 
तापसीने केलेल्या या कौतुकाच्या बदल्यात तापसीला मात्र वेगळेच काहीतरी मिळाले. रंगोली तापसीला आपल्या बहिणीची स्वस्तातली कॉपी म्हणाली. रंगोलीने तापसीच्या ट्वीटला उत्तर देत लिहिले, 'काही लोक कंगनाला कॉपी करून आपले दुकान चालवतात, मात्र लक्ष द्या, ते कधीच तिच्याकडे लक्षपूर्वक पाहात नाहीत आणि तिच्या चित्रपटाच्या ट्रेलरचे कौतुक करताना तिचे नावही घेत नाही. यापूर्वी जेव्हा मी तापसीजीला बोलताना ऐकले होते तेव्हा ती म्हणत होती की, कंगनाला दुप्पट फिल्टरची गरज आहे आणि तापसीजी तुम्ही स्वस्त कॉपी होणे बंद केले पाहिजे.'

 

 

तापसीच्या सपोर्टसाठी आले डायरेक्टर अनुराग कश्यप ... 
यावेळी मग तापसी पन्नूला सपोर्ट करण्यासाठी डायरेक्टर अनुराग कश्यप समोर आले. अनुरागने रंगोलीला ट्वीट करून उत्तर दिले, 'रंगोली हे जरा जास्त होते आहे. हे खूप निराशाजनक आहे. मला माहित नाही मी यावर काय बोलावे. तुझी बहीण आणि तापसी दोघींसोबतही मी काम केले आहे... मला कळत नाहीये.... एका ट्रेलरचे कौतुक करणे म्हणजे त्यातील सर्वच गोष्टींचे कौतुक करणे असते. ज्यामध्ये कंगनादेखील येते.'

बातम्या आणखी आहेत...