आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनमध्ये सहावा सर्वात जास्त कमाई करणारा भारतीय चित्रपट ठरला राणी मुखर्जीचा 'हिचकी'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क. राणी मुखर्जीचा कमबॅक चित्रपट 'हिचकी'ला भारतीय प्रेक्षकांची पसंती मिळाली नाही. पण चीनमध्ये हा चित्रपट प्रेक्षकांना भावला आहे. अवघ्या 20 कोटींमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने चीनमध्ये 15 मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास 114.19 कोटींची कमाई केली आहे. चीनमध्ये एवढी कमाई करणारा 'हिचकी' हा सहावा भारतीय चित्रपट ठरला आहे. 

 

हे चित्रपट आहेत टॉपवर 
ट्रेड एनालिस्ट तरण आदर्शनुसार हिचकीपुर्वी आमिर खानच्या दंगल आणि सीक्रेट सुपरस्टार, सलमान खानचा बजरंगी भाईजान, हिंदी मीडियम आणि पीकेने चीनमध्ये चांगली कमाई केली होती. चित्रपटाचा एकुण बिझनेस 160 कोटी रुपये होता. 

 

टॉरेट सिंड्रोमवर आधारित आहे चित्रपट 
चित्रपटामध्ये राणीला टॉरेट सिंड्रोम हा आजार असतो. यामध्ये तिला वारंवार उचकी येते. हा एक विचित्र आजार आहे. यामध्ये ती बोलताना अडकते. तरीही शिक्षक बनावे असे राणीचे स्वप्न असते. पण तिला कुठेही जॉब मिळत नाही. अशा वेळी तिला जॉब मिळतो. पण तिला यावेळी 14 सर्वात जास्त बिघडलेल्या मुलांना सुधारण्याचे काम दिले जाते. हे काम पुर्ण करण्यात तिला अनेक अडचणी येतात. 

बातम्या आणखी आहेत...