आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपचा माढा मतदारसंघाचा तिढा अखेर सुटला.. फलटणच्या रणजितसिंह नाईक निंबाळकरांना उमेदवारी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- भाजपचा माढ्याचा तिढा अखेर सुटला आहे. फलटणच्या रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीची घोषणा शुक्रवारी करण्यात आली. माढ्यातून राष्ट्रवादीकडून संजय शिंदे निवडणुकीच्या रिंगणात आहे. बहुजन वंचित आघाडीने विजय मोरे यांना मैदानात उतरवले आहे. 23 एप्रिलला येथे मतदान होणार आहे. त्यामुळे संजय शिंदेविरुद्ध रणजितसिंह नाईक निंबाळकर अशी लढत होणार आहे.

 

माढ्यात राष्ट्रवादीचे वर्चस्व..

माढा मतदासंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे. 2009 च्या मतदारसंघ फेररचनेत पूर्वीचा पंढरपूर लोकसभा मतदारसंघ माढा लोकसभा मतदारसंघ म्हणून अस्तित्वात आला होता. पंढरपूर लोकसभा मतदारसंघ असताना 1977 पासून 1999 पर्यंत या  मतदारसंघावर काँग्रेसचे वर्चस्व होते. अर्थात त्यामागे मोहिते पाटील घराण्याची मोठी शक्ती होती. मात्र, 1999 ला शरद पवार काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर मोहिते पाटीलही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर रामदास आठवले 1999 आणि 2004 असे दोन वेळा मोठ्या मताधिक्याने विजयी झाले होते.

 

शरद पवार 3 लाख मताधिक्याने निवडून आले

2009 ला विजयसिंह मोहिते पाटील माढ्यातून निवडणूक लढायला इच्छुक होते. मात्र राजकीय सत्ता संघर्षातून त्यांना माघार घ्यावी लागली आणि शरद पवार तीन लाख मताधिक्याने निवडून आले. 2014 ला मोदी लाटेचा अंदाज घेत शरद पवारांनी लोकसभा निवडणूक न लढवता राज्यसभेवर जाणे पसंत केले होते.

2014 निवडणुकीची आकडेवारी..

उमेदवार पक्ष मतदान
विजयसिंह मोहिते पाटील        राष्ट्रवादी  489989
सदाभाऊ खोत        स्वा. शे. संघटना  464645
प्रतापसिंग मोहित पाटील अपक्ष 25187
कुंदन बनसोडे          बसपा 15790
नवनाथ पाटील         हिंदुस्थान प्रजा पक्ष  8853

 

 

बातम्या आणखी आहेत...