आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पुणे - कर्णधार अंकित बावणेच्या (२०४) नाबाद द्विशतकापाठाेपाठ मुकेश चाैधरी (४/९९), अक्षय पालकर (३/३६), सत्यजित बच्छाव (३/८०) यांच्या धारदार गाेलंदाजीच्या बळावर महाराष्ट्राने रणजी ट्राॅफीत दणदणीत विजयाची नाेंद केली. यजमान महाराष्ट्र संघाने आपल्या घरच्या मैदानावर पाहुण्या आेडिशावर १० गड्यांनी मात केली. यासह क गटाच्या गुणतालिकेत महाराष्ट्र संघाला आघाडी घेता आली. सामन्यात झंझावाती द्विशतक साजरे करणारा अंकित सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. त्याने महाराष्ट्राच्या विजयाने आपले रणजी सामन्याचे शतक साजरे केले. त्याचा करिअरमधील हा १०० वा रणजी सामना हाेता. दुसरीकडे विदर्भ आणि केरळ, मुंबई-साैराष्ट्र यांच्यातील सामना अनिर्णीत राहिला. चार संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला.
पहिल्या डावात ५४३ धावांचा डाेंगर उभा करणाऱ्या महाराष्ट्राने दुसऱ्या डावात आेडिशाचा २८९ धावांवर खुर्दा उडवला. यातून महाराष्ट्राला विजयासाठी आवाक्यातले अवघ्या ४० धावांचे लक्ष्य मिळाले. सलामीवीर राहुल त्रिपाठी (२१) आणि अंकित बावणेने (१४) नाबाद खेळी करताना ११ षटकांत महाराष्ट्राचा विजय निश्चित केला. महाराष्ट्राने अव्वल फलंदाजी आणि गाेलंदाजीच्या बळावर सामन्यात माेठ्या विजयाची नाेंद केली.
ओडिशा संघाने खडतर लक्ष्याच्या प्रत्युत्तरात शुक्रवारी बिनबाद २४ धावांवरून खेळण्यास सुरुवात केली. सलामीवीर शंतनू २१ आणि कर्णधार सेनापती १२ धावांची खेळी करून पॅव्हेलियनमध्ये परतले. दरम्यान, सलामीवीर सारंगीने (७३) एकाकी झंुज देताना अर्धशतक साजरे केले. या वेळी त्याला पाेद्दारची (११८) माेलाची साथ मिळाली. त्यांनी झंझावाती खेळी करताना संघाचा धावसंख्येचा आलेख उंचावला. मात्र, या दाेघांच्या विकेटनंतर तळातल्या फलंदाजांना फार काळ मैदानावर आव्हान कायम ठेवता आले नाही.
मुकेशचे चार बळी
महाराष्ट्र संघाच्या विजयात गाेलंदाजांचे माेलाचे याेगदान राहिले. यात मुकेश चाैधरीने दुसऱ्या डावात चार विकेट घेतल्या. त्याने पहिल्या डावात दाेन बळी घेतले हाेते. याशिवाय अक्षय पालकर आणि सत्यजितने दुसऱ्या डावात प्रत्येकी तीन गडी बाद केले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.