आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रणजी करंडक अंतिम सामना; पुजारा, वासवदाच्या खेळीमुळेे साैराष्ट्रचे पारडे जड

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजकाेट : चेतेश्वर पुजारा अाणि अरप्रित वासवदा यांनी तब्बल पाच तास किल्ला लढवून ३८० चेंडूंचा सामना करित सहाव्या गड्यासाठी केलेल्या १४२ धावांच्या भागीदारीमुळे यजमान साैराष्ट्रने बंगालविरुद्ध रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यावर दुसऱ्या दिवसअखेर वर्चस्व मिळविले. त्यामुळेच साैराष्ट्रचा संघ सामन्यात दुसऱ्या दिवशी ८ बाद ३८४ धावा करू शकला.

नाणेफेक जिंकून साेमवारी प्रथम फलंदाजी स्वीकारल्यानंतर साैराष्ट्रच्या संघाने पहिल्या दिवसाअखेर ५ बाद २०६ धावा केल्या हाेत्या. पहिल्या दिवशी ताप असल्यामुळे अवघ्या ५ धावा फलकावर असताना मैदानावरून परतलेल्या पुजाराने दुसऱ्या दिवशी मात्र सकाळी खेळ सुरू केला. २३७ चेंडूंमध्ये ६६ धावांची खेळी केली. वासवदाने २८७ चेंडूंमध्ये १०६ धावा काढल्या. दाेन सत्र अाणि त्यानंतरची ५ षटके या जाेडीने खेळून काढली. त्यांच्या धावसंख्येत दुसऱ्या दिवशी ७९.१ षटकांमध्ये ३ गडी गमावून १७८ धावांची भर पडली. बंगालचा वेगवान गाेलंदाज मुकेश कुमार याने चहापानानंतरच्या सत्रात पुजारा अाणि चिराग जानी यांचा तंबूचा रस्ता दाखविला, परंतु ताेपर्यंत सामन्यावरील त्यांची पकड निसटली हाेती. बंगालच्या गाेलंदाजांना दिवसातील पहिले यशदेखील तिसऱ्याच सत्रात मिळाले. वासवदा यष्टिचीत झाल्याने पुजारासमवेत त्याची जाेडी फुटली. या दाेघांनी सकाळी फलंदाजीला उतरल्यानंतरच टिकून खेळण्याचे धाेरण दाखवून दिले हाेते.

बंगालच्या गाेलदाजांना काेणतीही संधी द्यायची नाही. खराब चेडूंची वाट पाहायची अाणि धावा वाढवायच्या, अशा पद्धतीने त्यांनी ५ तास किल्ला लढविला. पहिल्या दिवशी बंगालच्या गाेलंदाजांनी ८०.५ षटके गाेलंदाजी केली हाेती. मंगळवारी पहिल्या ५ षटकांनंतरच त्यांनी नवीन चेंडू घेतला. मात्र उपाहारापूर्वी अाणि त्यानंतरच्या सत्रात त्यांचे वेगवान तसेच मंदगती गाेलंदाज काहीही चमकदार कामगिरी करू शकले नाहीत. पुजाराने १९१ चेंडूंमध्ये अर्धशतकी मजल मारली. त्यानंतर मात्र त्याने वेगाने धावा जमविल्या. पुजारा-वासवदा जाेडीने पहिल्या २ सत्रांमधील ५८.१ षटकांच्या खेळात १३३ धावांची भर घातली.
पहिल्या दिवशी अर्धशतकी खेळी करणारा साैराष्ट्रचा फलंदाज विश्वराज जडेजा याने दुसऱ्या दिवशी अाम्ही अाणखी १०० ते १५० धावांची भर घालू असा विश्वास व्यक्त केला हाेता. प्रत्यक्षात पुजारा अाणि वासवदा यांनी त्यापेक्षाही अधिक चांगली फलंदाजी करून संघाला पहिल्या डावातील माेठ्या अाघाडीच्या दिशेने नेण्यात महत्वाची भूमिका बजावली.

प्रथम श्रेणी सामन्यांतील वासवदाचे अाठवे शतक

रणजी करंडक स्पर्धेत साैराष्ट्रला उपांत्य सामन्यात गुजरातविरुद्धच्या विजयात वासवदाने महत्वाची भूमिका बजावली हाेती. त्याला अरविंद पुजारा यांचे प्रशिक्षण लाभले अाहे. मंगळवारी त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमधील अाठवे शतक पूर्ण केले. त्यात त्याने ११ चाैकार खेचले. चहापानासाठी खेळ थांबण्यास २० मिनिटे बाकी असताना नंदीचा चेंडू कट करून एक धाव घेत त्याने शतकी मजल गाठली. साैराष्ट्रच्या संघाचे पहिल्या डावात अजून दाेन गडी बाद व्हायचे अाहेत. त्यामुळे पहिल्या सत्रात हा डाव संपल्यास बंगालच्या संघाला कमीत कमी धावांवर राेखून पहिल्या डावात माेठी अाघाडी मिळविण्याचा प्रयत्न हा संघ करेल, त्यावरच विजेता ठरेल, हे निश्चित!

अरुण लाल यांची खेळपट्टीबाबत नाराजी

राजकाेट येथील खेळपट्टी अत्यंत निकृष्ट असल्याची टीका बंगालच्या संघाचे प्रशिक्षक अरुण लाल यांनी केली. चेंडू सहजपणे बॅटवर येत नाही. खाली राहताे. परंतु या स्थितीचा फायदा अामचे वेगवान गाेलंदाज घेऊ शकले नाहीत. त्यांनी अाणखी अचूक अाणि टप्प्यावर गाेलंदाजी करायला हवी हाेती, अशी अपेक्षादेखील त्यांनी दुसऱ्या दिवशीचा खेळ संपल्यानंतर व्यक्त केली.

राजकाेट येथे सुरू असलेल्या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बंगालविरुद्ध शतक पूर्ण केल्याचा अानंद व्यक्त करताना साैराष्ट्रचा फलंदाज अरप्रित वासवदा.
 

बातम्या आणखी आहेत...