आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माढ्यासाठी रणजित मोहिते पाटलांचे दबावतंत्र, गिरीश महाजन यांची घेतली भेट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय यांचा भाजपत प्रवेश होत असतानाच सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे तालेवार नेते विजयसिंह मोहिते पाटील यांचे चिरंजीव रणजित सिंह यांनी भाजप मंत्री गिरीश महाजन यांची मंगळवारी भेट घेतल्याने चर्चेला मोठे उधाण आले. रणजित सिंह भाजपत प्रवेश करणार काय, असे कयास लावले जात आहेत. सरकारचे संकटमोचक महाजनांनी सुजय यांच्या भाजप प्रवेशाचे सर्व सोपस्कार पार पाडले. त्याच महाजन यांच्या शिवनेरी या मुंबईतील शासकीय निवासस्थानी रणजित सिंह मोहिते पाटील यांनी आज सकाळी जाहीरपणे भेट घेतली.


माढ्यातील घडामोडी : विजयसिंह मोहिते पाटील हे यंदाही माढ्यातून इच्छुक आहेत. मात्र राष्ट्रवादीने निवृत्त सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांना तयारी करण्यास सांगितले होते. पक्षाध्यक्ष शरद पवारांनीही माढामधून लढण्याची इच्छा व्यक्त केली, पण नंतर ती मागे घेतली. आता येथे राष्ट्रवादीचा उमेदवार कोण, असा प्रश्न आहे. 


गिरीश महाजनांच्या भेटीमागची कारणे 
1.
प्रभाकर देशमुख यांना उमेदवारी दिली जाईल, अशी भीती मोहिते पाटील कुटुंबीयांना आहे. आम्हाला डावलल्यास आमच्यासमोर पर्याय आहे, असा राष्ट्रवादीला अप्रत्यक्ष इशारा देण्यासाठी रणजित सिंह यांनी महाजन यांची भेट घेतल्याचे कळते.


2. मतदारसंघ पुनर्रचनेत मोहिते कुटुंबीयांचा माळशिरस हा मजबूत विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाला. त्यातच माढाही हातचे गेल्यास सोलापूर जिल्ह्यात त्यांची राजकीय स्पेस संपुष्टात येऊ शकते. त्या अस्वस्थतेूनच रणजित सिंह हे महाजन यांच्या घराचा उंबरा चढल्याचे समजते आहे.

बातम्या आणखी आहेत...