आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

होऊन जाऊ...द्या...दुध का दुध पाणी का...पाणी..शिंदे-मोहिते तुम्ही एकदा आमने सामने याच..

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माढा - (सोलापुर) माढा लोकसभा मतदार संघाकडे राज्यांचे लक्ष वेधले गेले असुन राष्ट्रवादी व भाजपा या दोन्ही पक्षांच्या उमेदवारींचा सस्पेन्स  कायम असला तरी मतदार संघातुन माजी खा.रणजितसिंह मोहिते पाटील याची उमेदवारी भाजपा मधुन जवळपास निश्चित मानली जात  असताना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे हे देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातुन निवडणुक लढविणार असल्याची माहिती विश्वसनिय सूत्रांकडुन मिळाली आहे. त्यामुळे शिंदे विरुद्ध मोहिते पाटील अशी कडवी झुंज माढा मतदार संघात होण्याची दाट शक्यता  आहे. 
त्यामुळे अशी लढत झाल्यास किसमें कितना हैं दम...ते या दोघांच्या लढतीतुन समोर येईलच...!  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांची उमेदवारी उद्या जाहिर होईल.
 


माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांचे नाव राष्ट्रवादी कडुन आघाडी वर आहे.त्यांचे समर्थक उमेदवारी साहेबांनाच जाहीर होईल या विश्वासात आहेत. असे असले तरी देखील मतदार संघातील आपले जुने सहकारी  भाजपात गेल्याने त्यांना तोडीस तोड टस्सल देणारा उमेदवार म्हणुन संजय शिंदे यांना उमेदवारी देण्याविषयी शरद पवार व अजित पवार राजकीय गणित आखत असल्याचे समजते आहे.


लोकसभा निवडणुक लढविण्यास मी इच्छुक नसल्याचे सांगत करमाळा विधानसभा माझे लक्ष्य आहे असे संजय शिंदे ठासुन सांगत असले तरी देखील अजित ब्रिगेड चे ओळखले जात असलेले संजय शिंदे याना अजित पवार हे तिकीट देऊन उभा करतील अशी निश्चित राजकीय खेळी होणार आहे. दरम्यान जिल्हा परिषद  अध्यक्ष  संजय शिंदे व रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यात लढत झाल्यास दोघा पैकी कोणाची  किती ताकद आहे ते समोर येईल.


 तरुणाईसह  गावगठ्यावर मतदार राजा  देखील 
 " एकदा होऊन जाऊ द्या दोघांत लढत"म्हणजे कळेल दुध का दुध पाणी का पाणी  ते"... राजकीय विश्लेषक देखील शिंदे विरुद्ध मोहिते पाटील अशी लढत होण्याची दाट  चिन्हे असल्याचे बोलताहेत.त्यामुळे शिंदे व मोहिते पाटील घराण्यांचा संघर्ष लोकसभा निवडणुकीत पाहायला  मिळणार ? हाच उत्सुकतेचा व चर्चेचा विषय मतदार संघात ठरला आहे.

जि.प.अध्यक्ष संजय शिंदे व माजी खा.रणजितसिंह मोहिते पाटील या दोघां मध्ये आता पर्यंत  कुठे ही राजकीय लढत झालेली नाही.कटशहाच्या राजकारणात दोन्ही दिग्गज घराणे परस्पर विरोधी लढतील .? असा प्रश्न देखील उपस्थित झाला आहे.


निंमगाव चे शिंदे व अकलुज चे मोहिते पाटील या दोघा घराण्यात असलेली जुनी  राजकीय कटुता व कटशहाचे राजकारण  सर्वश्रुत आहेच.ते वेळोवेळी जिल्ह्याच्या राजकारणात आपण पाहिलेच आहे.ते वेगळे सांगण्याची आवश्यकता भासत नाही.ही कटुता जिल्हा परिषद अध्यक्ष पदांच्या निवडींत झालेल्या राजकीय संघर्षातुन ही अधिक वाढत गेली. मुळात अकलुज चा सिंह भाजपाच्या जाळ्यात अडकला गेल्याने रणजितसिंह मोहिते पाटील आता भाजपवासी झाले आहेत.


इतकी वर्षं राजकारणापासून अलिप्त राहिलेल्या रणजितसिंहाची आता नव्याने राजकीय  इनिंग सुरु झाली आहे.
रणजितसिंह मोहिते पाटील यांची उमेदवारी भाजपा मधुन जवळपास निश्चित मानले जाते आहे.तसा भाजपासाठी तगडा दुसरा  उमेदवार मतदार संघात देखील नाही.सहकार मंत्री सुभाष देशमुख याचे देखील नाव चर्चेत आहे. 

का होऊ शकतो संजय शिंदे चा उमेदवारी साठी विचार- 
रणजितसिंह मोहिते पाटील यांना भाजपाकडुन  उमेदवारी देण्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे.
दरम्यान आता राष्ट्रवादी कडुन मोहिते ना थोपविण्यासाठी राष्ट्रवादी चे अजित ब्रिगेड पुढे सरसावले आहेत.अजित पवार हे संजय शिंदे यांना उभा करतील.कारण मोहिते ना तगडी फाईट संजय शिंदे हेच देऊ शकतील.अकलुज च्या शिवरत्न बंगल्या समोर झालेल्या मोहिते पाटील कार्यकत्याॅच्या बैठकीत अजित पवार व जिल्हाध्यक्ष दिपक साळुंखे  यांना एकेरी भाषा वापरली गेली होती.हा रिपोर्ट अजित पवार यांच्या पर्यत गेल्याने अजित पवार हे फुल पाॅवर देऊन संजय शिंदे यांना उभा करतील अशी दाट  राजकीय  संभाव्यता आहे.

अजित पवार हे वस्ताद होते तेव्हा दोघे ही तालमित होते-
राष्ट्रवादी काँग्रेस चे पहिले प्रदेशाध्यक्ष असताना रणजितसिंह मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी पक्ष वाढीसाठी झटले.कार्यकर्ते ही एकवटले गेले.अजित पवार हे वस्ताद तर रणजितसिंह मोहिते पाटील व संजय शिंदे हे दोघे ही त्यांच्याच तालमिच्या आखाडत आहेत.त्यामुळे अजित पवार आपल्या आखाड्यातुन/तालमितुन गेलेल्या मल्लांचा राजकीय निभाव लावण्यासाठी राजकीय कौशल्य वापरतील हे नक्की 

बातम्या आणखी आहेत...