आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माढ्याचा तिढा अखेर सुटला; रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना भाजपकडून उमेदवारी, संजय शिंदेंशी होणार सामना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माढा- अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या माढा लोकसभा मतदारसंघांचा तिढा अखेर सुटला आहे. भाजपने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. रणजितसिंह निंबाळकर हे सातारा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहे, पण उद्या दे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांना माढ्याचे तिकीट देण्यात येणार असल्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

 

माढ्यात राष्ट्रवादीकडून संजय शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे, त्यामुळे आता रणजितसिंह निंबाळकर विरूद्ध संजय शिंदे असा थेट मुकावला पाहायला मिळणार आहे. तत्पुर्वी माढ्यातून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार निवडणूक लढवणार अस जाहीर झालं होत, पण ऐनवेळी पवारांनी माघार घेतल्यामुळे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांची उमेदवारी पक्की होती. पण त्यांचे सुपूत्र रणजितसिंब मोहिते पाटील यांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे त्यांचा पत्ता कट झाला. यानंतर भाजप रणजितसिंह मोहिते पाटील यांना मैदानात उतरवणार असे सगळ्यांना वाटत होते, पण भाजपने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना लोकसभेचे तिकीट दिले. 

बातम्या आणखी आहेत...