आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Ranu Mandal From America, Emily Zamourka Performs Live Gets Singing Contract After Her Video Gone Viral

ही आहे अमेरिकेतील राणू मंडल; कचरा वेचताना झाली व्हायरल, आता मिळाले हॉलिवूडचे कॉन्ट्रॅक्ट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूज डेस्क - भारताप्रमाणेच अमेरिकेत सुद्धा एक राणू मंडल सापडली आहे. लॉस एंजेलिसच्या सबवेखाली भीक मागून उदरनिर्वाह करणारी एमिली एक उत्कृष्ठ ऑपेरा सिंगर म्हणून नावारुपाला आली आहे. राणू मंडलप्रमाणेच तिने रस्त्यावर फिरताना गायलेले गाणे इंटरनेटवर व्हायरल झाले. ते लोकांना इतके आवडले की तिच्या नावाने स्पेशल इव्हेंटची मागणी होऊ लागली. त्याच मागणीवरून एमिलीने पहिल्यांदा स्टेज परफॉर्मंस दिले. सोबतच, अमेरिकेतील भिकाऱ्यांना सामोरे जाव्या लागणाऱ्या समस्या देखील तिने सर्वांसमोर मांडल्या आहेत.

मूळची रशियन असलेली एमिली झमूरका (52) लॉस एंजेलिसच्या सबवेखाली राहते. याच ठिकाणी ती गेल्या दोन वर्षांपासून भीक मागून आपला उदरनिर्वाह चालवते. परंतु, 26 सप्टेंबर रोजी तिचे नशीब अचानक पलटले. याच दिवशी गस्त लावत असताना लॉस एंजेलिस पोलिस अधिकाऱ्याने अमेरिकेतील राणू (एमिली) चा आवाज पहिल्यांदा ऐकला. या अधिकाऱ्याला तिचे गाणे इतके आवडले की त्याने आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून इंटरनेटवर अपलोड केले. यानंतर एमिली एक स्टार ऑपेरा सिंगर बनली.

इंटरनेटवरून मिळवला 52 लाख रुपयांचा निधी

सोशल मीडियासह माध्यमांचेही एमिलीवर लक्ष गेले. तिने एका मुलाखतीमध्ये सांगितले की तिचे वाद्य तुटल्याने गाणे बंद करत आहे. यावर लोक इतके भावूक झाले, की त्यांनी 'गो फंड मी' या वेबसाइटवर तिच्या नवीन व्हायोलीन आणि नव्या लाइफस्टाइलसाठी 75 हजार अमेरिकन डॉलरची (जवळपास 54 लाख रुपये) मागणी केली. आणि अवघ्या काही दिवसांतच या वेबसाइटवरून तिला 72 हजार अमेरिकेन डॉलर (जवळपास 52 लाख रुपये) मिळाले.

हिमेशप्रमाणेच अमेरिकेतील प्रसिद्ध संगीतकाराने केला करार

संगीतकार हिमेश रेशामियाने राणू मंडलसोबत करार करून गाणे रेकॉर्ड केले होते. अगदी त्याच प्रमाणे ग्रॅमी अवॉर्ड विजेता संगीतकार जोएल डायमंड यांनी एमिलीसोबत गाणे रेकॉर्ड करणार असल्याची घोषणा केली. एमिलीसोबत जोएल यांची कंपनी एक करार देखील करणार आहे. एमिलीने हे सर्वच एका स्वप्नासारखे असल्याचे म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...