आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रानू मंडलचा तो व्हायरल फोटो होता फेक, स्वतः मेकअप आर्टिस्टने उघड केले सत्य 

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः रेल्वे स्टेशनवर गाणी गाऊन प्रसिद्धीझोतात आलेल्या गायिका रानू मंडल सध्या सोशल मीडियावर त्यांच्या मेकओव्हरच्या छायाचित्रांमुळे चर्चेत आहेत. अलीकडेच रानू एका फॅशन शोमध्ये सहभागी झाल्या होत्या. या इव्हेंटमध्ये त्यांनी मेकअप केलेला एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. भडक मेकअपमुळे त्या ट्रोल झाल्या होत्या. सोशल मीडियावर त्यांच्या मेकओव्हरची चांगलीच खिल्ली उडवली गेली होती. असा भडक मेकअप केल्यामुळे मेकअप आर्टिस्टवरचीही फिरकी घेतली गेली होती. पण आता या व्हायरल फोटोमागचे सत्य समोर आले आहे. रानू यांचा मेकओव्हर करणा-या मेकअप आर्टिस्ट संध्या यांनी रानू यांच्या मेकअपचा खरा फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

संध्या यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये एका बाजूला संध्या यांनी स्वत: मेकअप केलेला फोटो आहे तर दुसऱ्या बाजूला एडिट केलेला खोटा फोटो आहे.  रानू मंडल यांची खिल्ली उडवण्यासाठी कोणीतरी हा फोटो जाणूनबूजून  व्हायरल केला होता, असे त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे. सोबतच त्यांनी ट्रोलर्सना कुणाचीही अशी खिल्ली न उडवण्याचा सल्लाही दिला आहे. 


संध्या यांनी लिहिले, तुम्ही बघू शकता एका छायाचित्रात आमची मेहनत दिसतेय, तर दुस-या छायाचित्राला एडिट केले गेले आहे. सर्व खिल्ली आणि ट्रोल्स  ठिक आहेत, त्यामुळे आपण हसतो. पण एखाद्याच्या भावना दुखावणे हे योग्य नाही. मी आशा करते की, तुम्ही खरा आणि फेक फोटो ओळखाल. 

संध्या यांनी लिहिले, तुम्ही बघू शकता एका छायाचित्रात आमची मेहनत दिसतेय, तर दुस-या छायाचित्राला एडिट केले गेले आहे. सर्व खिल्ली आणि ट्रोल्स  ठिक आहेत, त्यामुळे आपण हसतो. पण एखाद्याच्या भावना दुखावणे हे योग्य नाही. मी आशा करते की, तुम्ही खरा आणि फेक फोटो ओळखाल.