आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Ranveer Deepika Background Dancer Starting Career: Shahid Kapoor To Sushant Singh Rajput And Diya Mirza Background Dancer Of Aishwarya Rai Shahrukh Khan

एकेकाळी शाहरुख-अमिताभच्या मागे डान्स करायचा रणवीर सिंह, काजोलच्या बहिणीची बॅकग्राऊंड डान्सर होती दीपिका, करिअरच्या सुरुवातीच्या काळात स्टार्सच्या मागे करायची रॅम्प वॉक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः अभिनेता रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण सध्या त्यांच्या लग्नामुळे चर्चेत आहेत. आज दोघेही बॉलिवूडचे A लिस्टर स्टार्स आहेत. दोघेही त्यांच्या सुपरहिट चित्रपटांमध्ये नंबर वन स्थानावर आहेत. हे कपल गॉडफादरशिवाय बॉलिवूडमध्ये आले. करिअरच्या सुरुवातीच्या काळात दोघांनाही बराच संघर्ष करावा लागला होता. तुम्हाला आश्चर्य वाटेल की, आज जगभरात प्रसिद्ध असलेले दीपवीर यांनी एकेकाळी बॉलिवूड अॅक्टर्सच्या गाण्यांमध्ये बॅकग्राऊंड डान्सर म्हणून केले होते. होय हे दोघेही चित्रपटसृष्टीत अभिनय करण्यापूर्वी बॅकग्राऊंड डान्सर होते.

 

रणवीर सिंह 

- रणवीरला बालपणापासूनच नृत्याची  आहे. त्याने अनेक चित्रपटांमध्ये बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम केले आहे.
- 2001 मध्ये आलेल्या 'कभी खुशी कभी गम' या चित्रपटातील गाजलेल्या 'बोले चूडियां' या गाण्यात रणवीरने शाहरुख खान, अमिताभ बच्चन आणि हृतिक रोशनच्या मागे बॅकग्राउंड डान्सर म्हणून काम केले होते. 

 

दीपिका पदुकोण 
- रणवीरसोबत लग्नाच्या बेडीत अडकलेली दीपिकासुद्धा पुर्वी बॅकग्राऊंड डान्सर होती. तिने काजोलची चुलत बहीण शर्बानी मुखर्जीच्या एका म्युझिक व्हिडिओत बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम केले होते. याशिवाय हिमेश रेशमियाच्या 'तेरा सुरूर' या गाण्यातही ती डान्सर म्हणून झळकली होती. करिअरच्या सुरुवातीच्या काळात दीपिकाने फरदीने खानच्या मागे रॅम्पवॉकही केला होता. शर्बानीचे फिल्मी करिअर फारसे खास राहिले नव्हते. तिने अवघ्या चार पाच चित्रपटांमध्येच काम केले होते.

- या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला सांगतोय, बॉलिवूडच्या अशा 10 सेलेब्सविषयी ज्यांनी करिअरची सुरुवात बॅकग्राऊंड डान्सर म्हणून केली होती.

 

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, सुशांत सिंह राजपूत, दीया मिर्झासह आणखी अशा सेलिब्रिटींविषयी ज्यांनी बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम केले होते...

 

बातम्या आणखी आहेत...