• Home
  • Party
  • Ranveer Deepika enjoying honeymoon in sri lanka And meet cricketer sanath jayasuriya

लग्नाच्या दीड महिन्यांनी / लग्नाच्या दीड महिन्यांनी हनीमून एन्जॉय करायला श्रीलंकेत पोहोचले दीपवीर, एअरपोर्टवर रणवीरला बघताच फोटोग्राफर्स ओरडले 'आला रे आला सिम्बा आला'..., आनंदात रणवीरने मीडियाला दिली जादूची झप्पी : Video

हनीमूनसोबत न्यू इयर आणि पत्नी दीपिकाचा वाढदिवस विदेशात सेलिब्रेट करणार रणवीर

दिव्य मराठी वेब टीम

Dec 31,2018 12:23:00 PM IST

मुंबईः 14-15 नोव्हेंबर रोजी इटलीत लग्नाच्या बेडीत अडकल्यानंतर रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण शनिवारी रात्री हनीमूनसाठी रवाना झाले. नवविवाहित दाम्पत्य दीपवीर लग्नाच्या दीड महिन्यांनी श्रीलंकेत हनीमून साजरा करत आहेत. मुंबई विमानतळावर हे दोघेही ब्लॅक कलरच्या मॅचिंग आऊटफिटमध्ये दिसले. विमानतळावर रणवीरला बघऊन फोटोग्राफर्स "आला रे आला सिम्बा आला..." असे ओरडू लागले. हे ऐकून रणवीर आनंदी झाला, मात्र मीडियाच्या विनंतीनंतरही दोघांनी एकत्र पोज दिली नाही. उलट रणवीर पत्नी दीपिकाला विमानतळाच्या आत सोडून बाहेर आणि सर्व फोटोग्राफर्सना जादूची झप्पी दिली. श्रीलंकेत पोहोचताच दीपिका-रणवीर सर्वप्रथम क्रिकेटपटू सनथ जयसूर्याला भेटले. हे दोघे परदेशीच न्यू इयर साजरा करणार आहे. सोबतच येत्या 5 जानेवारी रोजी दीपिका वाढदिवस आहे, रणवीर दीपिकाचा वाढदिवसही येथेच साजरा करणार असून त्यानंतर भारतात परतणार आहे.


'सिम्बा'ने ओपनिंग डेला केले कोट्यवधींचे कलेक्शन...
- लग्नानंतर रणवीर सिंहचा 'सिम्बा'हा पहिला चित्रपट रिलीज झाला असून चित्रपटाला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळतोय. दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या या चित्रपटात रणवीर सिंहसोबत सैफ अली खानची मुलगी सारा अली खान झळकली आहे.


- या चित्रपटात एसीपी संग्राम भालेरावची भूमिका साकारणा-या रणवीरचा पोलिस अधिका-याच्या रुपातील अंदाज प्रेक्षक आणि समीक्षकांना भावला आहे. ट्रेड अॅनालिस्ट रमेश बाला यांनी दिलेल्या माहितीनुसार, या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवशी भारतात 22 कोटींचा बिझनेस केला आहे.


- दीपिकाच्या वर्कफ्रंटविषयी सांगायचे म्हणजे 2018 मध्ये तिचा 'पद्मावत' हा चित्रपट रिलीज झाला होता. तर मेघना गुलजार यांच्या आगामी 'छपाक' या चित्रपटात ती झळकणार असून हा चित्रपट अॅसिड अटॅकला बळी पडलेल्या लक्ष्मी अग्रवाल हिच्या आयुष्यावर आधारित आहे.

X
COMMENT