आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीपिका वहिनीसाठी नणंदेने ठेवली पार्टी, डीजेच्या धुनवर असे थिरकले नवदाम्पत्य

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई. दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंहने 14 आणि 15 नोव्हेंबरला इटलीच्या लेक कोमोमध्ये लग्न केले. भारतात परतल्यानंतर पदुकोण कुटूंबाकडून 21 नोव्हेंबरला बेंगळुरुमध्ये रिसेप्शन देण्यात आले. यानंतर 24 नोव्हेंबरच्या रात्री रणवीर सिंहची बहिण रितिका भवनानीने भाऊ आणि वहिनीसाठी ग्रँड पार्टी ठेवली. याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. वेडिंग सेरेमनीमध्ये आणि रिसेप्शन पार्टीमध्ये रणवीर सिंह खुप एलिगेंट अवतारात दिसला. पण बहिणीने दिलेल्या पार्टीमध्ये रणवीरने धमाल केली. आपल्या अतरंगी कपड्यांसाठी ओळखला जाणार रणवीर या पार्टीमध्ये रंगीबिरंगी कपड्यांमध्ये दिसला. 

 

मुंबईच्या ग्रँड हयातमध्ये रणवीरच्या बहिणीने दिली पार्टी 
शनिवारी रात्री मुंबईच्या ग्रँड हयातमध्ये रणवीर सिंहची बहीण रितिका भवनानीने पार्टीचे आयोजन केले होते. रणबीरने डीजे नाइटमध्ये तुफान डान्स केला. या वेळी रणवीरने खुलून त्याचा आनंद व्यक्त केला आणि चित्रपटांच्या गाण्यावर तुफान डान्स केला. पार्टीच्या ठिकाणाची सजावटही सुंदर करण्यात आली होती. पार्टीदरम्यान रणवीर सिंहने आपला मित्र आणि डिझायनर मनीष अरोराचे आउटफिट घातले होते.

 

दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह 28 नोव्हेंबरला मुंबईमध्ये ग्रँड रिसेप्शन देणार आहेत. या रिसेप्शनमध्ये बॉलिवूडपासून दूस-या फिल्डमधील दिग्गजही उपस्थित असतील. दीपिका आणि रणवीरची जोडी  'राम-लीला : गोलियों की रास लीला', 'बाजीराव-मस्तानी' आणि 'पद्मावत' सारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये दिसली आहे. 

 

बहिणीच्या बर्थडे पार्टीमध्ये टेबलावर चढून नाचला होता रणवीर 
रणवीर हा बहिण रितिकाच्या खुप जवळ आहे. एका मुलाखतीत तो आई अंजू भवनानीला आपला मोठी आणि आणि दीदी रितिकाला लिटिल मॉम म्हणाला होता. यासोबतच दीदी रितिकाकडून मला एवढे प्रेम मिळाले की, मी बिघडलो असे तो मीडियाशी बोलताना म्हणाला होता. काही दिवसांपुर्वी 2018 मध्ये रणवीर बहिण रितिकाच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये टेबलावर चढून डान्स करताना दिसला होता.
 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...