आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनेक देशांच्या टुरिझम बोर्डाकडून 'दिपवीर'ला पेड मधुचंद्राचे आमंत्रण... पण लग्नानंतर लगेच सुरू करणार काम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण यांच्या लग्नाला दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. दोघांनाही वेग-वेगळ्या टुरिझम बोर्ड्सकडून पेड हनीमून ट्रिपचे आमंत्रण मिळणे सुरू झाले आहे. यामध्ये सर्वात पुढे आहे ते स्वित्झर्लंड टुरिझम बोर्ड. याचे कारण म्हणजे रणवीर सिंग स्वत: स्वित्झर्लंड टुरिझम बोर्डाचा इंडियन ब्रँड अँबेसिडर आहे.

 

दोघांकडेही हनीमूनसाठी वेळ नाही
> सुत्रांनी सांगितल्यानुसार, स्वित्झर्लंड पर्यटन बोर्डाने दोघांना सुंदर ठिकाणी हनीमूनसाठीचे आमंत्रण पाठवले आहे. स्वित्झर्लंड पर्यटन बोर्डाने सर्वात आधी पुढाकार घेण्याचे कारण म्हणजे दिपवीर हनीमूनसाठी इथे आले तर अप्रत्यक्षरीत्या प्रमोशन होईल. दिपवीरला आमंत्रण पोहचले आहे, परंतू त्यांनी आतापर्यंत कोणतेही आमंत्रण स्विकारले नाही. सुत्रांनी सांगितल्यानुसार, दिपवीरने बंगळुरू आणि मुंबई या दोन ठिकाणी रिसेप्शन देण्याचे ठरवले असुन दोघांकडेही हनीमूनसाठी खुपवेळ नसणार आहे.

 

रिसेप्शननंतर लगेच काम सुरू करणार रणवीर

> नोव्हेंबरमध्ये लग्न समारंभ झाल्यानंतर रणवीर डिसेंबरच्या सुरवातीला काम सुरू करणार असुन पुर्ण डिसेंबर महिना व्यस्त असणार आहे. 3 डिसेंबरला रणवीरचा आगामी चित्रपट सिंबाचा ट्रेलर लाँच होणार आहे. ट्रेलर रिलीज झाल्यानंतर रणवीर चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असणार आहे. 28 डिसेंबरला सिंबा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे दिपवीरकडे हनीमूनसाठी वेळच नसणार आहे किंवा खुप कमी वेळ आहे.

 

बातम्या आणखी आहेत...