आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीपिकाने कानात सांगितले असे काही की जोरजोरात हसू लागला रणवीर, नव-याला हसताना बघून दीपिकालाही आवरले नाही हसू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह यांच्या लग्नाचे दुसरे रिसेप्शन बुधवारी 28 नोव्हेंबर रोजी मुंबईतील हॉटेल ग्रॅण्ड ह्यातमध्ये संपन्न झाले. या रिसेप्शन पार्टीत दीपिकाने व्हाइट-गोल्डन कलरची साडी परिधान केली होती, तर रणवीरसुद्धा मॅचिंग शेरवानीत दिसला. रिसेप्शनस्थळी पोहोचल्यानंतर रणवीर आणि दीपिका मीडियाला पोज देत होते, यावेळी दीपिकाने रणवीरच्या कानात काहीतरी सांगितले, त्यावर रणवीर जोरजोरात हसताना दिसला. रणवीरला हसताना बघून दीपिकालाही हसू आवरले नाही.  


वर शेरवानी तर खाली लहेंग्यासारखा होता रणवीरचा ड्रेस... 

रिसेप्शनमध्ये रणवीरने जो ड्रेस परिधान केला होता, तो वरुन शेरवानीसारखा तर खाली लहेंग्याचा फिल देमारा होता. तसं पाहता, रणवीर त्याच्या विचित्र ड्रेसिंग सेन्ससाठी ओळखला जाते. बहीण रितिकाने आयोजित केलेल्या डीजे पार्टीतही रणवीर विचित्र आऊटफिटमध्ये दिसला होता. त्यावरुन तो ट्रोलदेखील झाला होता. 


रिसेप्शन स्थळी करण्यात आली होती फुलांची सजावट...
रिसेप्शन व्हेन्यूवर पांढ-या फुलांनी सजावट करण्यात आली होती. दीपिकाला फुले अतिशय आवडतात, ती कायम फुलांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. बुधवारी झालेल्या पार्टीत दीपवीर यांनी नातेवाईक आणि मीडियातील लोकांना आमंत्रित केले होते. तर येत्या 1 डिसेंबर रोजी होणा-या पार्टीत बॉलिवूड सेलेब्स सहभागी होणार आहेत. दीपिका-रणवीरचे 14-15 नोव्हेंबर रोजी इटलीतील लेक कोमो येथे कोंकणी आणि सिंधी पद्धतीने लग्न झाले. 

बातम्या आणखी आहेत...