आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इटली / दीपिका-रणवीरच्या सिक्रेट लग्नात कडेकोट सुरक्षाव्यवस्था असूनदेखील छत्रीने लपवावा लागला त्यांना चेहरा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


बॉलिवूड डेस्कः अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. दोघांचे बुधवारी कोकणी पद्धतीने लग्न लागले. तर गुरुवारी दोघे सिंधी पद्धतीने पुन्हा एकदा विवाहबद्ध होणार आहेत. दीपवीर यांनी त्यांच्या लग्नाचे फोटोज आणि व्हिडिओ लीक होऊ नये यासाठी कडेकोड सुरक्षाव्यवस्था ठेवली आहे. पण तरीदेखील मीडियाच्या नजरेपासून दूर राहण्यासाठी दोघांना छत्रीची मदत घ्यावी लागली.


लग्नस्थळी बॅन होते मोबाइल
दीपवीर यांनी लग्नस्थळावरील फोटोज आणि व्हिडिओज लीक होऊ नये यासाठी प्लानिंग केले होते. दोघांनी व्हेन्यूवर सुरक्षेसाठी तब्बल 1 कोटी रुपयांहून अधिकचा खर्च केला आहे. रिपोर्ट्सनुसार,  लेक कोमो येथील Villa Balbianello च्या जवळपास मोटर बोट्सवर कॅमेरा लावलेले सिक्योरिटी गार्ड्स तैनात आहेत. पण कडेकोट सुरक्षा व्यवस्था असूनदेखील लग्नस्थळावरील फोटो आणि व्हिडिओ लीक झाले आहेत. पण यापैकी एकही फोटो स्पष्ट नसून धुसर आहेत. एका रिपोर्टनुसार, गुरुवारी दुस-या लग्नानंतर दीपिका-रणवीर त्यांच्या लग्नाचे फोटोज स्वतः शेअर करणार आहेत.


छत्रीने लपवावा लागला लूक
दीपवीर यांच्या लग्नासंबंधीत एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये हे दोघेही मीडियाच्या नजरेपासून दूर राहण्यासाठी काळ्या छत्रीने स्वतःचा चेहरा लपवताना दिसत आहेत. लग्नस्थळी उपस्थित असलेले पाहुणेदेखील दीपिका-रणवीरला छत्रीच्या मदतीने लपवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. लग्नसमारंभ अगदी खासगी ठेवण्यासाठी पाहुण्यांना मोबाइल फोन न वापरण्याची विनंती करण्यात आली आहे. पाहुण्यांच्या मोबाइल कॅमे-यावर स्टिकर चिकटवण्यात आले आहेत. समोर आलेल्या व्हिडिओत दीपिका व्हाइट आणि गोल्डन कलरच्या साडीत दिसत आहे. तर रणवीरने व्हाइट आणि गोल्डन कलरचे कॉम्बिनेशन असलेला ट्रेडिशनल आउटफिट परिधान केला आहे.

 

लग्नानंतर ग्रॅण्ड रिसेप्शन
इटलीतील ग्रॅण्ड लग्नानंतर दीपवीर मुंबईत 28 नोव्हेंबर रोजी हॉटेल ग्रॅण्ड ह्यात येथे रिस्पेशन पार्टी देणार आहेत. रिसेप्शन रात्री 8 वाजता सुरु होणार असून हे रिसेप्शन रणवीरचे पालक होस्ट करणार आहेत. तर 21 नोव्हेंबर रोजी दीपिकाचे होमटाऊन असलेल्या बंगळुरु येथे रिसेप्शन पार पडणार आहे. हे रिसेप्शन दीपिकाचे पेरेंट्स होस्ट करतील. 

बातम्या आणखी आहेत...