• Home
  • Party
  • Ranveer And Deepika Romantic Dance And Kapil Sharma Mother Dances With Deepika Padukone At Reception

कपिलच्या रिसेप्शनमध्ये रणवीर-दीपिकाचा / कपिलच्या रिसेप्शनमध्ये रणवीर-दीपिकाचा दिसला रोमँटिक अंदाज, दीपिकासोबत 'आंख मारे'वर थिरकली कपिलची आई : VIDEO

रणवीरने दीपिकासाठी गायले 'सुबह होने न दे' हे साँग... 

दिव्य मराठी वेब टीम

Dec 25,2018 02:19:00 PM IST

मुंबईः प्रसिद्ध विनोदवीर कपिल शर्मा आणि गिन्नी चतरथ यांचे वेडिंग रिसेप्शन सोमवारी रात्री मुंबईतील जे. डब्ल्यू मॅरियट हॉटेलमध्ये पार पडले. या रिसेप्शन पार्टीला रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण यांनी चारचाँद लावले. यावेळी रणवीरच्या आगामी 'सिम्बा' या चित्रपटातील 'आँख मारे' या गाण्याची धूम राहिली. सिंगर मीका सिंगसोबत रणवीर सिंहने हे गाणे येथे गायले. जेव्हा रणवीर गात होता, तेव्हा दीपिका डान्स करत होती. खास गोष्ट म्हणजे 'आँख मारे' या गाण्यावर दीपिकासोबत कपिलची आई जनकरानी यांनीही ठेका धरला. कपिल आणि गिन्नी त्यांना चिअर करताना दिसले.


रणवीर-दीपिकाचा रोमँटिक अंदाज...
रिसेप्शन पार्टीत रणवीर आणि दीपिका यांचा रोमँटिक अंदाजही बघायला मिळाला. दोघांनी स्टेजवर रोमँटिक डान्स केला.

X
COMMENT