आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिंगर हर्षदीपने दीपवीरच्या लग्नातून शेअर केला फोटो, पण काही काळातच करावा लागला डिलीट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क. रणवीर-दीपिकाच्या लग्नाच्या विधी सुरु झाल्या आहेत. 13 नोव्हेंबरला संगीत सेरेमनी झाली, यामध्ये सिंगर हर्षदीप कौर, बॉबी पाठक, संजोय दासने परफॉर्म केले. हा फोटो हर्षदीपने वेडिंग वेन्यूवरुन मेंदी सेरेमनीनंतर शेअर केला होता. यानंतर रणवीर आणि दीपिकाने रिक्वेस्ट केल्यानंतर हा फोटो तिला डिलीट करावा लागला.

 


फोन कॅमेरावर लावले स्टीकर 
सिक्योरिटी खुप टाइट आहे. पाहूण्यांच्या मेबाइल कॅमेरांवर स्टीकर चिटकवण्यात आले आहेत. पण वेन्यूवरुन अजून कोणताही फोटो आलेला नाही. दीपिकाचे जिम ट्रेनर नम आणि हेअर स्टायलिस्ट गेब्रियलनेही आपला फोटो शेअर केला आहे. विशेष म्हणजे वेन्यूवर कोणत्याही गेस्टला फोटो क्लिक करण्यास सख्त मनाई करण्यात आली आहे. 


आज कोकणी पद्धतीने तर उद्या सिंधी पद्धतीने विवाहसोहळा संपन्न होणार असल्याचं समजतंय. या विवाहसोहळ्याला कोणालाही मोबाइल फोन वापरण्याची परवानगी नाही. हा दिवस संस्मरणीय करण्यासाठी दीपवीरने लग्नासाठी खुप तयारी केली आहे. बॉलिवूडमधल्या या खास लग्नाची उत्सुकता सर्वांनाच आहे. इटलीत विवाहसोहळा पार पडल्यानंतर दीपिका वीर लगेचच मुंबईत परतणार आहे. जे लग्नासाठी इटलीत उपस्थिती राहणार नाही त्यांच्यासाठी मुंबईत जंगी पार्टीचं आयोजन करण्यात आलं आहे.

 

बातम्या आणखी आहेत...