आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीप-वीर वेडिंग / दीपिका-रणवीरने केली पाहुण्यांना गिफ्टऐवजी डोनेशन देण्याची अपील, रिसेप्शनमध्ये एन्ट्रीपूर्वी स्कॅन होणार कार्डचा QR कोड

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह यांनी लग्नानंतर मुंबई आणि बंगळुरु येथे वेडिंग रिसेप्शनचे आयोजन केले आहे. येत्या 14 आणि 15 नोव्हेंबर रोजी दोन पद्धतीने हे दोघे इटलीत विवाहबद्ध होणार आहेत. त्यानंतर 21 नोव्हेंबर रोजी बंगळुरु आणि 28 नोव्हेंबर रोजी मुंबईत वेडिंग रिसेप्शन पार पडणार आहे. दोघांनी रिसेप्शनमध्ये येणा-या पाहुण्यांना गिफ्ट्स न देण्याची विनंती केली आहे. ही अपील दोघांनी इन्व्हिटेशन कार्डच्या माध्यमातून केली आहे.

 

काय लिहिले आहे कार्डमध्ये : दीपिका आणि रणवीर यांनी रिसेप्शन कार्डच्या माध्यमातून पाहुण्यांना गिफ्ट न आणण्याची विनंती केली आहे. त्याऐवजी काही रक्कम चॅरिटीसाठी डोनेट करावी, असे त्यांनी म्हटले आहे. दीपिका आणि रणवीर हे दोघेही द लिव लव लाफ फाउंडेशन या संस्थेशी जुळले आहे. लग्नात पाहुण्यांनी दिलेली रक्कम संस्थेला डोनेट करण्याचा निर्णय दोघांनी घेतला आहे. 

 

हायटेक आहे इन्व्हिटेशन कार्ड : रणवीर आणि दीपिकाचे रिसेप्शन कार्ड इतर कार्ड्सच्या तुलनेत अतिशय वेगळे आणि हायटेक आहे. या कार्डवर स्पष्ट नमूद करण्यात आले आहे की, रिसेप्शनला येणा-या पाहुण्यांनी त्यांच्या मोबाइलमध्ये या कार्डचे 'ई-इन्वाइट' घेऊन यावे लागेल. सुरक्षेच्या दृष्टीने एन्ट्री करताना सर्व पाहुण्यांच्या ई-इन्वाइटवर असलेला QR कोड स्कॅन केला जाणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...