आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेडिंग रिसेप्शन/ भांगेत कुंकू, गोल्डन साडी आणि हेवी ज्वेलरीमध्ये दिसली दीपिका, तर बायकोचा पदर सावरताना दिसला रणवीर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क. दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंहच्या लग्नाचे पहिले रिसेप्शन बंगळुरुमध्ये झाले. रिसेप्शनमध्ये दीपिका गोल्डन कलरच्या साडीमध्ये सुंदर दिसली. ओव्हरऑल लूकविषयी बोलायचे झाले तर दीपिकाने हेवी डायमंड नेकलेस, ईयररिंग्स, लाल चूडा घातला होता. तिने भांगेत कुंकू भरुन आपला लूक कंम्पीट केला. तर रणवीर ब्लॅक आणि गोल्डन रंगाच्या शेरवानीमध्ये दिसला. स्टेजवर पोहोचताच रणवीरने पाहिले की, दीपिकाच्या साडीचा पदर फरशीवर खराब होतोय, तेव्हा त्याने लगेच पत्नीचा पदर सावरला. 'द लीला पॅलेस'मध्ये हे रिसेप्शन ठेवण्यात आले होते. 

 

रेड आणि गोल्डन थीम
दीपिकाला रेड रोज खुप आवडतात यामुळे हॉटेल रेड रोजने सजवण्यात आली होती. यासोबतच डायनिंग एरियाला रॉयल लूक देण्यासाठी टेबल्सला कँडल्स आणि फ्लावर्सने सजवण्यात आले होते. हॉटेलमध्ये कडक सुरक्षा बंदोबस्त होता. 

 

रणवीरने घातले होते मॅचिंग शूज 
नेहमीच अतरंगी कपड्यांमध्ये दिसणा-या रणवीरने रिसेप्शन दरम्यान शेरवानीला मॅचिंग असणारे शूज घातले होते. रणवीरच्या ड्रेसप्रमाणे त्याचे शूजही ब्लॅक-गोल्डन होते. रिसेप्शनमध्ये क्रिकेटर अनिल कुंबले पत्नीसोबत पोहोचला. यासोबतच शटलर पीव्ही सुंधुसोबतच बेंगलोरचे अनेक दिग्गज पोहोचले. 21 नोव्हेंबरच्या रिसेप्शननंतर 28 नोव्हेंबरला रणवीरचे पॅरेंट्स एक रिसेप्शन होस्ट करणार आहेत. या रिसेप्शनमध्ये रणवीरचे कुटूंब, फ्रेंड्स आणि जवळचे नातेवाईक येतील. यानंतर 1 डिसेंबरला मुंबईमध्ये रिसेप्शन ठेवण्यात आले आहे. यामध्ये बॉलिवूड आणि दूस-या फील्डचे सेलिब्रिटी पोहोचतील. 

 

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा रिसेप्शन दरम्यानचे फोटोज...

 

 

 

बातम्या आणखी आहेत...