आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Deepika Padukone Ranveer Singh Mumbai Reception Inside Photos: Deepveer Spent Time With Amitabh Bachchan Rekha To Shilpa Shetty Honey Singh And Guru Randhawa

पत्नीला नव्हे या अॅक्टरला Kiss करताना दिसला रणवीर, दीपिकाने शिल्पा शेट्टी-बिग बींसोबत घालवला वेळ, रिसेप्शनमध्ये हनी सिंग-गुरु रंधावासोबत दीपवीरने धरला ताल, दाम्पत्याने घेतला रेखाचा आशीर्वाद : 16 Inside Photos

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण यांनी शनिवारी बॉलिवूड स्टार्ससाठी मुंबईतील हॉटेल ग्रॅण्ड ह्यात येथे रिसेप्शन पार्टीचे आयोजन केले होते. रिसेप्शनला बॉलिवूडमधील अनेक स्टार्स पोहोचले होते. या पार्टीचे काही इनसाइड फोटो समोर आले असून यात दीपवीर गेस्टसोबत डान्स आणि पार्टी एन्जॉय करताना दिसत आहे. रणवीरचा एक असा फोटो समोर आला आहे, ज्यात तो पत्नी दीपिकाला नव्हे तर अभिनेता मनीष पॉलला किस करताना दिसतोय. शिवाय आणखी एका फोटोत दिग्दर्शक रोहित शेट्टीसोबत रणवीरसोबत कोजी होताना तर रणवीर लाजताना दिसतोय. दीपवीरने हनी सिंगपासून ते गुरु रंघावासह अनेक सिंगर्ससोबत ताल धरला होता. या नवविवाहित दाम्पत्याने यावेळी अभिनेत्री रेखाचा  आशीर्वाद घेतला. शिवाय दीपिकाने शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा, अमिताभ बच्चन, शाहरुख खान यांच्यासोबत बराच वेळ पार्टीत घालवला. 

 

पार्टीत दीपिकाने घातले होते स्पोर्टस शूज... 

- पार्टीत रेड कलरच्या शिमरी हेवी गाऊनमध्ये दीपिका अतिशय सुंदर दिसली. पण या हेवी ड्रेसमुळे थकल्यानंतर तिने गाऊनवर कॅरी केलेले लाँग अपर काढून टाकले आणि त्याच्या आत परिधान केलाला शॉर्ट ड्रेस कॅरी केला. दीपिकाने या ड्रेससोबत सुरुवातीला हाय हिल्स घातले होते. पण नंतर धमाल-मस्ती करताना तिने हाय हिल्स काढून स्पोर्ट्स शूज घातले.
- तर पार्टीच्या सुरुवातीला ब्लॅक सूटमध्ये दिसलेल्या रणवीरनेही काही वेळाने ड्रेस चेंज केला आणि नंतर अॅनिमल प्रिंटचा कोट घातला.


रिसेप्शन पार्टीत पोहोचले होते हे सेलेब्स...
- दीपवीरच्या रिसेप्शनमध्ये मुकेश आणि नीता अंबानी यांच्यासोबत त्यांची दोन्ही मुले आकाश-अनंत, मुलगी ईशा, होणारी सून श्लोका आणि अनंतची कथित गर्लफ्रेंड राधिका मर्चंट सहभागी झाली होती. या पार्टीत मुकेश अंबानींच्या मातोश्री कोकिला बेन अनुपस्थित होत्या.
- बॉलिवूडमधून संजय दत्त-मान्यता दत्त, हेमा मालिनी, राणी मुखर्जी, अर्शद वारसी, अनिल कपूर, ऐश्वर्या राय, फराह खान, सचिन तेंडुलकर, कपिल शर्मा, जावेद अख्तर-शबाना आझमी, कल्कि कोचलिन, आर. माधवन, कपिल देव, जितेंद्र, तुषार कपूर, शत्रुघ्न सिन्हा-पत्नी पूनम, मुलगी सोनाक्षी सिन्हा, टायगर श्रॉफ-गर्लफ्रेंड दिशा पाटनी, सारा अली खान, जाह्नवी कपूर, बोनी कपूर, अर्जुन कपूर, मलायका अरोरा, खुशी कपूर, अंशुला कपूर, ईशान खट्टर दीपवीरच्या रिसेप्शनमध्ये सहभागी झाले होते.


14-15 नोव्हेंबर रोजी झाले लग्न...
- दीपवीरने 14-15 नोव्हेंबर रोजी इटलीतील लेक कोमो येथे सप्तपदी घेतल्या. 14 नोव्हेंबर रोजी कोंकणी पद्धतीने लग्न झाल्यानंतर 15 नोव्हेंबर रोजी दीपिका-रणवीरने सिंधी पद्धतीने लग्न थाटले. लग्नानंतर 21 डिसेंबर रोजी दोघांचे बंगळुरु येथे रिसेप्शन झाले.


- 28 नोव्हेंबर रोजी कपलचे मुंबईतील हॉटेल ग्रॅण्ड ह्यात येथे दुसरे रिस्पेशन झाले. या पार्टीत मीडिया आणि दोघांचे फॅमिली मेंबर्स सहभागी झाले होते. 30 नोव्हेंबर रोजी दीपिका आणि रणवीर यांनी मुंबईतील सिद्धीविनायकाच्या मंदिरात जाऊन बाप्पाचे दर्शन घेतले. यावेळी दोघांची एक झलक बघण्यासाठी चाहत्यांनी त्यांच्याभोवती गराडा घातला होता.


- दीपिका आणि रणवीर यांनी पाच वर्षांच्या रिलेशनशिपनंतर लग्न थाटले. 'गोलियों की रासलीला : रामलीला' (2013) या चित्रपटाच्या सेटवर दोघांचे सूत जुळले होते. त्यानंतर ही जोडी  'फाइंडिंग फॅनी', 'बाजीराव मस्तानी' आणि 'पद्मावत'  या चित्रपटांमध्ये एकत्र झळकली.


पुढील स्लाईड्सवर बघा, रणवीर-दीपिकाच्या रिसेप्शनचे Inside Photos...

बातम्या आणखी आहेत...