आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलाच्या वेडिंग रिसेप्शनमध्ये सून दीपिकाला टक्कर देताना दिसल्या सासूबाई, ब्लॅक गोल्डन लहेंग्यात गॉर्जिअस दिसल्या अंजू भवनानी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः मुलगा रणवीर आणि सून दीपिका यांच्या मुंबईतील रिसेप्शनमध्ये रणवीरची आई अंजू भवनानी ब्लॅक-गोल्डन लहेंग्यात दिसल्या. रिसेप्शनमध्ये दीपिकाच्या सासूबाईंनी लूकमध्ये सूनेला टक्कर दिली. रिसेप्शनमध्ये पोहोचलेल्या अंजू भवनानी यांच्या लूकचे सोशल मीडियावर लोकांनी कौतुक केले. रिसेप्शनमध्ये  दीपिकाची फॅमिली क्रीम कलरच्या थीममध्ये दिसली. तर रणवीरचे कुटुंबीय ब्लॅक थीममध्ये दिसले. येत्या 


1 डिसेंबर रोजी बॉलिवूड सेलेब्ससाठी होणार ग्रॅण्ड रिसेप्शन... 
दीपिका-रणवीरचे तिसरे रिसेप्शन 1 डिसेंबर रोजी मुंबईत होणार आहे. या रिसेप्शनला बॉलिवूडसह इतर दुस-या क्षेत्रातील मान्यवर उपस्थिती लावणार आहेत. दीपिवीर यांचे 14 आणि 15 नोव्हेंबर रोजी इटलीतील लेक कोमो येथे दोन पद्धतीने लग्न झाले. 14 नोव्हेंबर रोजी कोंकणी पद्धतीने तर 15 नोव्हेंबर रोजी सिंधी पद्धतीने हे दोघे विवाहबद्ध झाले. दीपिका-रणवीर यांचे पाच वर्षांपूर्वी 'गोलियों की रासलीला : रामलीला' (2013) च्या सेटवर अफेअर सुरु झाले होते. त्यानंतर ही जोडी 'फाइंडिंग फॅनी', 'बाजीराव मस्तानी' आणि 'पद्मावत' या चित्रपटांमध्ये एकत्र झळकली होती.

बातम्या आणखी आहेत...