आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रणवीर म्हणाला दीपिका जगातील सर्वात सुंदर मुलगी, फ्रीडा काहलोसोबत केली तुलना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड. दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंहने नुकतेच कोंकणी-सिंधी पध्दतीने लग्न केले. यानंतर बेंगळुरुमध्ये रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले होते. यानंतर 24 नोव्हेंबरला रणवीर सिंहची बहिण रितिका भवनानीने भाऊ आणि वहिनीसाठी एक ग्रँड पार्टी ठेवली होती. या पार्टीमध्ये रणवीर-दीपिका एकमेकांवर सॉफ्ट कमेंट करताना दिसले. रणवीरने दीपिकाच्या वेशभूषेवरुन तिच्यावर कमेंट केली. त्याने दीपिकाची तुलना मॅक्सिकन आर्टिस्ट फ्रीडा काहलोसोबत केली आणि म्हणाला की, तु या ड्रेसमध्ये त्यांच्यासारखी दिसत आहेस. 

 

सोन्या आणि चांदीच्या धाग्यांचा झाला वापर 
रितिकाच्या पार्टीमध्ये दीपिकाने सब्यसाचीव्दारे डिझाइन केलेला केसरीबाई पन्नालाल कलेक्शनचा दिल गुलदस्ता नावाचा लहेंगा घातला होता. हा या कलेक्शनचा सर्वात जास्त कलरफुल आणि सुंदर लहेंगा होता. सब्यसाचीने त्यांच्या इंस्टाग्राम पोस्टवरुन याविषयी सांगितले होते. यामध्ये सांगण्यात आले होते की, हा लहेंगा सजवण्यासाठी बोर्डेक्स रेशमवर हाताने रंगवलेले मखमल, रेशमचे फूल, सोने-चांदीचे धागे आणि गुलाबी क्रिस्टल स्फटिकचा वापर करण्यात आला आहे. 

 

सब्यसाचीने पोस्ट केले फोटो 
रणवीरने कमेंट केल्यानंतर सब्यसाचीने दीपिकाचे फोटोज पोस्ट केले आहेत. यामध्ये तिने लहेंगा घातलेला आहे. लाल आणि गुलाबी रंगाचा ड्रेस तिला शोभून दिसतोय. फोटोमध्ये दीपिका ज्या अंदाजात दिसतेय, यामध्ये ती एकदम मॅक्सिन कलाकार फ्रीडा काहलोसारखी दिसतेय. तिचे स्मोकी आईज आणि ओठ तिचा लूक कम्प्लेट करत आहेत. तिचा हा लूक पाहून रणवीरने दीपिकावर ही कमेंट केली आणि ती जगातील सर्वात सुंदर मुलगी असल्याचे सांगितले. 

 

चित्रकार होत्या फ्रीडा काहलो 
फ्रीडा काहलो डी रिवेरा मॅक्सिकोच्या सर्वात प्रसिध्द महिला चित्रकार होत्या. त्यांनी मॅक्सिकोचा निसर्ग आणि कलाकृतींवर प्रेरित होऊन मोठ्या संख्येत पोट्रेट पेंटिंग्स बनवल्या होत्या. त्यांनी बनवलेल्या पेंटिंग्समध्ये त्यांच्या स्वतःचे फोटोज जास्त होते. त्यांनी 1962 मध्ये आपली पहिली पोट्रेट पेंटिंग्स बनवली होती. यामध्ये त्या वेलवेट ड्रेस घालून दिसत होत्या. फ्रीडा काहलो या आपल्या केसांमध्ये ताजे फूलं लावण्यासाठी ओळखल्या जात होत्या. 
 

 

बातम्या आणखी आहेत...