आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'83\' चित्रपटासाठी स्वतः कपिल देव देणार रणवीरला प्रशिक्षण, भूमिकेत फिट बसण्यासाठी रणवीरला करावी लागणार प्रचंड मेहनत 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क. रणवीर '83' मध्ये माजी क्रिकेटपटू कपिल देवची भूमिका साकारणार आहे. यात 1983 मध्ये भारताने विश्वषक मिळवले होते याचा जल्लोष दिसणार आहे. चित्रपट भव्य-दिव्य करण्यासाठी कबीर खान जीवतोड मेहनत घेत आहे. सूत्राच्या माहितीनुसार, कॅमेऱ्यासमोर खेळाची तयारी करण्यासाठी अभिनेत्यांना प्रशिक्षण देण्याचे काम आधी कबीर करणार आहे. त्यामुळे कबीर सर्व कलाकारांना घेऊन मोहालीला जाण्याची योजना आखत आहे.

 

काय होईल कॅम्पमध्ये 
मोहालीमध्ये विश्वकप विजेते कपिल देव, मदन लाल आणि यशपाल शर्मा उपस्थित राहणार आहेत. याबरोबरच रणजी ट्रॉफीचे अनेक क्रिकेटरदेखील उपस्थित असतील. ते सर्व कलाकारांसोबत चर्चा करतील आणि आपले अनुभव सांगतील. त्यांच्यासोबत क्रिकेटदेखील खेळतील. येथे आलेल्या सर्वच खेळाडूंबरोबरच कपिल स्वत: रणवीरला आपली माहिती देणार आहे. शिवाय त्याला क्रिकेटचे बारकावे शिकवणार आहे.

 

कपिल पाजी बनण्यासाठी रणवीर या गोष्टी शिकणार 
- 15 दिवसांचा कॅम्प असेल. 
- फलंदाजीचे कौशल्य 
- कपिलचे लो बॅक लिफ्ट. 
- बुटासोबत फळी ठेवण्याची स्टाइल. 
- खेळपट्टीवर षटकार मारणे. 
- विजेसारख्या वेगाने धावणे. 

 

चित्रपटात कपिलने अंतिम सामन्यात रिचर्ड््सची कॅच घेतल्याचा तो ऐतिहासिक क्षणदेखील चित्रपटात खूपच महत्त्वाचा आहे. यासाठी रणवीरला या तीन गोष्टी शिकाव्या लागतील. 
- क्षेत्ररक्षण
- धावणे
- चेंडूफेक 

 

हेदेखील महत्त्वाचे 
शरीर- रणवीर कपिलसारखा दिसण्यासाठी वेगळी टीम आहे. ते यावर मेहनत घेत आहेत. 
उत्सव- झेल घेतल्यानंतर कपिलचया उत्सव साजरा करणाऱ्या शैलीचे काळजीपूर्वक व्हिडिओ पाहावे लागतील. 

10 एप्रिल रिलीज डेट आहे. 
83 विश्व चषकावर आधारित 

 

गोलंदाजी 
- कपिल यांची गोलंदाजी खूपच युनिक आहे. ती आत्मसात करण्यासाठी रणवीरला खालील काही बाबींवर लक्ष द्यावे लागेल. 
- डावा हात चेहऱ्यावर : कपिल गोलंदाजी करताना आपला डावा हात चेहऱ्यासमोर ठेवायचे. हे त्यांचे वैशिष्ट्य होते, तेे रणवीरला कॉपी करावे लागेल. 


साइड चेस्ट अॅक्शन 
- कपिल नेहमी इतर खेळाडूंपेक्षा वेगळी गोलंदाजी करत होते. ते छातीवर चेंडू ठेवून फेकायचे. तेदेखील यात रणवीरला शिकावे लागणार आहे. 
- शैली : कपिल गोलंदाजी करताना नेहमी दोन्ही पाय वर करत चेंडू भिरकावत हाेते. ही त्यांची शैली लोकांना आवडायची. 
- रनअप : चेंडू फेकल्यानंतर कपिलचे वाऱ्यासारखे वेगाने पळणे यावर रणवीरला खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. 

कपिलचे पूर्ण व्यक्तिमत्त्व : कपिल यांची व्यक्तिरेखा पडद्यावर साकारणे रणवीरसाठी खूप मोठे आव्हान आहे. यासाठी 15 दिवसांपेक्षा जास्त दिवस कॅम्पमध्ये घालवावे लागतील. 
 

 

बातम्या आणखी आहेत...