• Home
  • News
  • Ranveer Singh And Deepika Padukone are all smiles as they fly to Italy for wedding

लग्नासाठी 5 दिवसांपुर्वीच / लग्नासाठी 5 दिवसांपुर्वीच इटलीला रवाना झाले रणवीर-दीपिका, एयरपोर्टवर मॅचिंग ड्रेसमध्ये दिसले

दिव्य मराठी वेब टीम

Nov 10,2018 10:59:00 AM IST

मुंबई. रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण शुक्रवारी (9 नोव्हेंबर) रात्री इटलीला रवाना झाले. या दरम्यान मुंबई एयरपोर्टवर त्यांना चाहत्यांनी आणि मीडिया फोटोग्राफर्सने घेरले. पण दीपिकाने कोणतेच इंटरॅक्शन केले नाही. फक्त स्माइल देऊन ती निघून गेली. पण रणवीर एक्साइटमेंट लपवू शकला नाही. रणवीरने आनंदात फोटोग्राफर्सला पोज दिल्या आणि त्यांच्यासोबत इंटरेक्शन केले, त्यांना फ्लाइंक Kiss दिली. यासोबतच रणवीर एयरपोर्टवर DDLJ चित्रपटातील प्रसिध्द गाणे 'डोली सजा के रखना...' हे गाणे वाजवताना दिसला.


दीपिका एकटी होती, तर रणवीर बहिण आणि पालकांसोबत दिसला
- एयपोर्टवर दीपिका आणि रणवीर वेगवेगळ्या कारमधून पोहोचले होते. दीपिका एकटीच दिसली. तर रणवीरची बहीण रितिका भवनानी, आई अंजू भवनानी आणि वडील जगजीत भवनानीही एयपोर्टवर दिसले. विशेष म्हणजे रणवीर आणि दीपिका मॅचिंग आउटफिटमध्ये पोहोचले होते. रणवीर आणि दीपिका इटलीमध्ये डेस्टिनेशन वेडिंग करत आहेत. त्यांच्या लग्नाचे फंक्शन 14 आणि 15 नोव्हेंबर रोजी इटलीच्या लेक कोमोमध्ये होणार आहे. दीपिका दक्षिण भारतीय असल्यामुळे 14 तारखेला दक्षिण भारतीय पध्दतीने लग्न होईल आणि 15 ला रणवीरच्या सिंधी पध्दतीने लग्न होणार आहे. 1 डिसेंबरला मुंबईमध्ये त्याचे रिसेप्शन होणार आहे.

X
COMMENT