आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिसेस सिंह बनताच दीपिका पदुकोणने शेअर केला लग्नाचा पहिला फोटो, दीपवीर दिसले या अंदाजात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई. रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोणच्या लग्नाचा पहिला फोटो समोर आला आहे. स्वतः दीपिका पदुकोणने दोन फोटोज इंस्टाग्रामवर शेअर केले आहे. यामधून एका फोटोमध्ये ती आणि रणवीर कोंकणी पध्दतीच्या लग्नात नवरदेव-नवरीच्या रुपात दिसत आहेत. तर दूस-या फोटोमध्ये ते सिंधी पध्दतीच्या लग्नात एकत्र दिसत आहेत. दोन्हीही फोटोमध्ये दीपिका आणि रणवीर बोलताना आणि खळखळून हसताना दिसत आहेत. या फोटोंना फक्त 7 मिनिटांमध्ये 3 लाखांपेक्षा जास्त लोकांनी लाइक केले. गुरुवारी दोघांनी सिंधी आणि बुधवारी कोंकणी पध्दतीने लग्न केले. 

 

कोंकणी पध्दतीत विवाहस्थळापर्यंत पायी चालत गेली दीपिका 

- सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 'वेडिंग वेन्यू सीक्रेट ठेवण्यात आले होते. दोन्ही कुटूंबातील पाहुण्यांनाही लग्नाचे अॅक्चुअल लोकेशन माहिती नव्हते. त्यांना सकाळी 7 वाजता तयार होण्यास सांगण्यात आले. पाहूण्यांना बोटीने वेन्यूपर्यंत नेण्यात आले. यानंतर त्यांना वेलकम ड्रिंकमध्ये फिल्टर कॉफी देण्यात आली. हे दीपिकाची फेव्हरेट ड्रिंक आहे. ही कॉफी स्पेशली बेंगळुरुमधून आणली होती. दीपिकाने कोंकणी पध्दतीसाठी लाल आणि सोनेरी रंगाचा सब्यसाची मुखर्जीचा लहेंगा घातला होता. तर रणवीरने पांढरा कुर्ता आणि पांढरा मुंडू घातला होता. या लग्नात नवरीने घरापासून लग्न स्थळापर्यंत पायी चालत यावे अशी पध्दत असते. तेव्हा दीपिका पायी लग्नाच्या ठिकाणापर्यंत पोहोचली. तेव्हा सिंगर शुभा मुदगल परफॉर्म करत होती.' सिंधी लग्नात रणवीरने कांजीवरम शेरवानी घातली होती. यामध्ये धाग्याचे वर्क होते. यासोबतच एक अलाबोरेट दुपट्टा त्यांने कॅरी केला होता. तर दीपिकाने रेड आणि गोल्ड लहेंगा आणि हेवी रीगल ज्वेलरी घातली होती.

 

असा होता मेन्यू 
- लग्नाच्या मेन्यूमध्ये सर्व पारंपारिक व्यंजन ठेवण्यात आले होते. यामध्ये पुरणपोळीपासून रसमपर्यंतचा समावेश होता. शेफला स्पेशली कर्नाटकमधून इटलीमध्ये आणण्यात आले होते. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे संपुर्ण इटॅलियन स्टाफ सर्व व्यंजनांचे नाव एकदम योग्य पध्दतीने घेत होते. ही सेरेमनी शानदार होती. दीपिका वरमाला प्रथा पुर्ण करत असताना तिचे कुटूंबिय आणि फ्रेंड्स इमोशनल झाले. हे दोघंही या वीकेंडला देशात परत येणार अशी अपेक्षा आहे. ते दोघं तीन रिसेप्शन देणार आहेत. पहिला रिसेप्शन बेंगळुरुच्या लीला हॉटेलमध्ये होईल. दूसरे हॉटेल ग्रँड हयात मुंबईमध्ये होईल. हे मीडियासाठी ठेवण्यात येईल. तिसरे रिसेप्शन 1 डिसेंबरला हॉटेल ग्रँड हयात मुंबईमध्ये होईल. यामध्ये इंडस्ट्रीचे मित्र सहभागी होतील. 

बातम्या आणखी आहेत...