आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इटलीमध्ये कच्छी, बिराना आणि लाडासह 26 विधी केल्यानंतर रणवीरची दुल्हनिया होणार दीपिका, सिंधी पद्धतीने थाटणार लग्न

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


बॉलिवूड डेस्कः सध्या बॉलिवूडमध्ये रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांच्या लग्नाची चर्चा सुरु आहे. रिपोर्ट्सनुसार हे दोघे यावर्षी नोव्हेंबर महिन्यात इटलीत लग्न थाटणार आहेत. लग्नात दोघांच्या कुटुंबीयांसह त्यांचे काही जवळचे मित्र सहभागी होणार आहेत. बातम्यांनुसार, सिंधी पद्धतीने दोघांचे लग्न होणार आहे. रणवीर सिंधी कुटुंबातून आहे. पण सिंधी पद्धतीचे लग्न कसे असते? या लग्नातील विधी कशा असतात? या लग्नाशी निगडीत 26 विधींविषयी आम्ही तुम्हाला या पॅकेजमधून सांगत आहोत...  

 
लग्नापूर्वीच्या विधी... 

 

1) कच्छी मिश्री : या विधीमध्ये वर आणि वधू यांच्या नवीन नात्याचा पाया ठेवला जातो. मुलगा-मुलगी लग्नासाठी एकमेकांना पसंत करतात आणि लग्नासाठी होकार देतात. मुलाचे कुटुंबीय मुलीच्या हातात आणि मुलीचे कुटुंबीय मुलाच्या हातात नगद पैशांसह नारळ, मिठाई, कपडे आणि फ्रूट्स ठेवतात. या विधीला रोका देखील म्हटले जाते. 

 

2) पक्की मिश्री : या विधीत मुलाचे कुटुंबीय आणि काही खास मित्रमंडळी मुलीच्या घरी जातात. येथे त्यांच्या समजातील गुरुजी गणेश पूजन करतात. त्यानंतर सगळ्यांना मिश्री, नारळ आणि मिठाई दिली जाते.  

 

3) पदरान : ही अंगठी घालण्याची विधी आहे. या विधीनुसार, मुलगा त्याच्या कुटुंबीयांसह मुलीच्या घरी येतो. येथे अंगठी किंवा छल्ला दोन्ही कुटुंबीयांमध्ये एक्सजेंट केला जातो. यावेळी केकही कापला जातो. 

 

4) बिराना : या विधीत सिंधी देव झुलेलाल यांची पूजाअर्चा केली जाते. दोन्ही कुटुंबीय वर-वधूसाठी प्रार्थना करतात. ही विधी लग्नाच्या दहा दिवसांपूर्वी केली जाते.  

 

5) लाडा किंवा बुक्की : या विधीअंतर्गत गुरुजी सात सवासिनींसोबत एका भांड्यात गणेशाची प्रतिमा ठेऊन त्यामध्ये तांदुळ, सुपारी, हळकंडाने पूजाअर्चा करतात. वर-वधूला मिठाई चारली जाते आणि लेडीज संगीत ठेवले जाते. यामध्ये सर्वजण शुभेच्छा देणारी गाणी गातात. 

 

6) लगुन : या विधीत मुलाचे कुटुंबीय गुरुजींकडून ग्रह नक्षत्र बघून मुहूर्त काढतात. त्यानंतर तो कागज नारळ आणि मिठाईसोबत मुलीच्या घरी पोहोचवण्यात येतो.  

 

7) देव बिठान : या विधीत जात्यावर देवाची स्थापना केली जाते. या पूजेला बानो हेदेखील म्हटले जाते. ही विधी लग्नाच्या पाच दिवसांपूर्वी केली जाते.  

 

8) घरी पूजा : या विधीत वर आणि वधूच्या घरी पूजा केली जाते. यामध्ये गुरुजी वर-वधूला मुठभर गहू देतात आणि मग काही विवाहित महिला हे गहू जात्यावर दळतात. या पूजेमुळे घरात समृद्धी येते, असे म्हटले जाते. 

 

9) मंडप पूजन : या विधीत गुरुजी आणि समाजातील काही प्रतिष्ठित व्यक्तींच्या हातून मंडपाची स्थापना केली जाते आणि गणेश पूजन केले जाते. 

 

10) मेंदी : या विधीत वर-वधूच्या हातापायांवर मेंदी लावली जाते. सोबतच महिला लग्नातील पारंपारिक गीते गातात. 

 

लग्नाच्या दिवशी होणा-या विधी...   

 

11) हळद : या विधीत वर-वधूला हळद आणि तेलाची पेस्ट लावली जाते. हळदीमुळे रंग उजळतो. या विधीनंतर वर आणि वधूला घराबाहेर पडण्यास परवानगी नसते.  

 

12) दिख :  ही विधी वराच्या कुटुंबीयांच्या वतीने केली जाते. यामध्ये गुरुजी वधूच्या घरुन काही वस्तू आणतात आणि त्यानंतर गणेश पूजन आणि ग्रहांची पूजा केली जाते.  

 

13) जेना आणि साग्री : जेना या विधीत वराच्या हातावर पवित्र धागा बांधला जातो. गुरुजी मंत्रोच्चारांसोबत हा धागा बांधतात. वधूच्या घरची मंडळी वरासाठी भेटवस्तू आणतात आणि त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्याला आशीर्वाद देतात. 

 

14) वनवास : या पूजेत गुरुजी आणि सात विवाहित महिला सहभागी होतात. या विधीत वर-वधूच्या डोक्यावर तेल टाकले जाते. 

 

15) पसली भरना : या विधीत वराची आई लाल कापडात नारळ, तांदुळ आणि एक रुपया ठेऊन वधूच्या कंबरेला बांधते. 

 

16) कंडी पूजा : या विधीत एका काटेरी रोपट्याची पूजा केली जाते. ही विधी वरात निघण्यापूर्वी

आणि वरात परतल्यानंतर केली जाते. 

 

17) वरात : नवरदेवाचे कुटुंबीय, नातेवाईक, मित्र वरात घेऊन वधूच्या घरी येतात. विवाहस्थळी पोहोचण्यापूर्वी नवरदेवाची आई देवाकडे प्रार्थना करते आणि वरात निघते. नवरदेव सजलेल्या घोडीवरुन रवाना होतो. 

 

18) वधूच्या घरी वरातीचे आगमन 

> स्वागत आणि गळाभेट :  वधूच्या कुटुंबीयांकडून नवरदेव आणि त्याच्या कुटुंबीयांचे स्वागत केले जाते. वधू आपल्या नवरदेवाच्या स्वागतासाठी बाहेर येते.
> पाय धुणे :  वर आणि वधूला वेगळे केले जाते. त्यानंतर वधूचा भाऊ दुधाने नवरदेवाचे पाय धुतो. या विधीत गुरुजी वर आणि वधूच्या पायाचे माप घेतात. 

 

19) वरमाला : या विधीत वर-वधू एकमेकांना फुलांचे हार घालतात. 

 

20) हथेलो : नवरदेवाजवळ एक पांढरा कापड अशतो. तो कापड वधूजवळ असलेल्या लाल कापडाशी बांधला जातो. वर-वधू उजव्या हाताने एका पवित्र लाल धाग्यात बांधले गेलेले असतात. 

 

21) गठबंधन : या विधीत वर-वधूचे गठबंधन केले जाते. 

 

22) सप्तपदी : सिंधी विवाह वैदिक परंपरांवर आधारित आहे. या विधीत यज्ञ लावून गणेशपूजन केले जाते. पूजारी मंत्रोच्चार करुन वर-वधूला आशीर्वाद देण्यासाठी भगवान गणेश आणि 64 देवी-देवतांना आमंत्रित करतात. 

 

23) कन्यादान : या विधीत वधूचे आईवडील तिचा हात वराच्या हातात सोपवतात.  

 

24) पाठवणी : या विधीत वधूचे वडील वराला भेटवस्तू देतात. त्यानंतर नवविवाहित दाम्पत्य नवरदेवाच्या घराच्या दिशेने रवाना होतात. नवरदेवाच्या घरी नववधूचे स्वागत केले जाते. 

 

लग्नानंतरच्या विधी 


25) चानेर : सिंधी अनुष्ठान लग्न दुस-या दिवशी केले जाते.  देव बिथान अनुष्ठाननुसार जाते स्थापित केले जाते. प्रार्थनेनंतर नवरदेवाची आई नवविवाहित दाम्पत्याला दूध, भात आणि साखर खाऊ घालते.  

 

26) सतौराह : या विधीत नवविवाहित दाम्पत्य पहिल्यांदा वधूच्या घरी जातात.   

बातम्या आणखी आहेत...