Home | Gossip | Ranveer Singh and Deepika Padukone will be seen together for the first time after their marriage, in film '83'

लग्नानंतर पहिल्यांदा या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण

दिव्य मराठी वेब टीम  | Update - May 15, 2019, 11:22 AM IST

चित्रपट '83' मध्ये रणवीर सिंह साकारत आहे कपिल देव यांची भूमिका... 

  • Ranveer Singh and Deepika Padukone will be seen together for the first time after their marriage, in film '83'

    मुंबई : रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण याचे लग्न मागच्यावर्षी झाले होते. आता त्यांच्याबद्दल जी बातमी मिळाली आहे ती कळाल्यावर त्यांचे सर्वच फॅन्स खूप खुश झाले आहेत. दीपिका पदुकोण जी रणवीर सिंहची रियल लाइफमध्ये पत्नी ती रील लाइफमधेही आता रणवीर सिंहची पत्नी बनणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार माहिती मिळाली आहे कि, दीपिका पादुकोण फिल्म '83' मध्ये रणवीर सिंहच्या पत्नीची एक महत्वाची भूमिका साकारणार आहे. यापूर्वीही अनेक चित्रपटांमध्ये दोघांनी एकत्र काम केले आहे. पण या दोघांनी हि कामे लग्नापूर्वी केलेली आहेत. मात्र आता लग्नानंतर पहिल्यांदाच हे दोघे नवरा बायकोच्या भूमिकेत दिसणार आहेत.

    दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंहने ''गोलियों की रासलीला - रामलीला'', ''पद्मावत'' आणि ''बाजीराव मस्तानी'' या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे आणि दोघांच्या जोडीला या चित्रपटामध्ये खूप पसंतीही मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दीपिका पदुकोणला रणवीर सिंहचा आगामी चित्रपट '83' साठी फायनल केले गेले आहे.

    भारताच्या पहिल्या क्रिकेट वर्ल्ड कपच्या कहाणीवर आधारित फिल्म '83' मध्ये रणवीर सिंह, कपिल देव यांची भूमिका साकारत आहे आणि दीपिका पदुकोण आता या फिल्ममध्ये कपिल देव यांच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. दीपिका सध्या फिल्म 'छपाक' च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

Trending