आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रिया प्रकाश वारियर म्हणतेय... रणवीरसोबत रोमान्स करण्याची इच्छा, पण या एका गोष्टीची वाटते भीती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क. डोळ्यांनी प्रेमळ इशारे करत एका रात्रीत प्रसिध्दी झोतात आलेली प्रिया प्रकाश वारियर लवकरच 'श्रीदेवी बंगलो' नावाच्या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ती नुकतीच मुंबईत आली होती. येथे आल्यावर ती विकी कौशलला भेटली. विकीनेदेखील तिला उरी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सहभागी करून घेतले. या वेळी ती रणवीर सिंहलादेखील भेटली, त्याला पाहताच ती खुश झाली. त्याला पाहून ती त्याच्याकडे धावत गेली. रणवीरनेदेखील प्रियाला ओळखले. प्रियाने सांगितले...,रणवीर माझा आवडता स्टार आहे. त्याच्यासोबत रोमान्स करायची आहे, मात्र असे केले तर दीपिका मला मारून टाकेल. प्रिया म्हणते...'रणवीर खूपच चांगला आहे. माझ्याशी तो चांगला बोलला. त्याने मला ओळखले याचा आनंद वाटतोय. त्याला माझी डोळा मारण्याची स्टाइल आवडली. रणवीरबरोबरच तिला शाहरुख खानदेखील आवडतो. ती शाहरुखची मोठी चाहती आहे. तिला शाहरुखसोबतदेखील रोमान्स करायचा आहे. आपल्या पहिल्या 'श्रीदेवी बंगलो' चित्रपटाविषयी ती म्हणाली... 'याचे नाव फक्त श्रीदेवीशी जुळते, चित्रपटात त्यांच्याविषयी काही आहे की नाही हे पाहण्यासाठी तुम्हाला चित्रपट पाहावा लागेल.'

 

वादाच्या भोव-यात अडकला चित्रपट 
'श्रीदेवी बंगलो'चा ट्रेलर रिलीज झाला आहे. प्रशांत ममबुली यांच्या डायरेक्शनमध्ये तयार झालेल्या या चित्रपटात प्रिया श्रीदेवी नामक अभिनेत्रीची भूमिका साकारत आहे. ती आपल्या स्टारडममुळे देश-विदेशात प्रसिद्ध आहे. पण ट्रेलर जसजसा पुढे सरकतो, अभिनेत्रीच्या आयुष्यातील डार्क साइड समोर येते. काही ठिकाणी प्रिया सिगारेट ओढताना दिसते, तर कुठे तिला मद्यसेवन दाखवली आहे. एका सीनमध्ये ती बाथरुममध्ये शॉवरखाली बसून रडताना दिसतेय. ट्रेलरचा शेवटचा सीन विचलित करणारा आहे. यावरुन बॉलिवूडची पहिली महिला सुपरस्टार दिवंगत श्रीदेवीच्या निधनाची आठवण येते. या सीनमध्ये अभिनेत्री बाथटबमध्ये बुडालेली दाखविण्यात आले आहे. तिचे फक्त पाय वर दिसत आहेत, यावरुन अभिनेत्रीचा मृत्यू झालाय असे दिसते. दरम्यान, 24 फेब्रुवरी 2018 ला दुबईच्या एका हॉटेलमध्ये बाथटबमध्ये बुडाल्यामुळे श्रीदेवीचा मृत्यू झाला होता.

 

बोनी कपूर यांनी पाठवली लीगल नोटीस 
अभिनेत्री श्रीदेवी यांचे पती बोनी कपूर यांनी चित्रपटाच्या टीमला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चित्रपटाच्या टीमला नोटीस मिळाली आहे, त्यांनी सांगितले की, "आम्हाला गेल्या आठवड्यात बोनी कपूर यांची नोटीस मिळाली. आम्ही या सर्वांचा सामना करु. आमच्या चित्रपटाचा ट्रेलर सस्पेंस आहे. आम्ही बोनी यांना सांगितले आहे की, श्रीदेवी हे एक सामान्य नाव आहे. माझ्या चित्रपटातील पात्रचे नावही हेच आहे. आम्ही सर्वांचा सामना करु." 
 

बातम्या आणखी आहेत...