आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रणवीर सिंह आणि बाकी कलाकारांची टीम चित्रपट '83' च्या शूटिंगसाठी रवाना, यूकेमध्ये शूट होणार आहे पहिले शेड्यूल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : चित्रपट '83' चे कलाकार आपल्या पहिल्या भागाच्या शूटिंगसाठी लंडनला रवाना झाले आहेत. तेथे जाण्याआधी टीमने एक फोटो सेशन केले. त्यात पूर्ण कलाकार सहभागी झाले. हा फोटो शेअर करताना रणवीर सिंहने लिहिले..., 'कपिल के डेविल्स. याबरोबरच रणवीरने आपला एक फोटो शेअर करत लिहिले..., अविस्मरणीय सिनेमॅटिक प्रवास सुरू करायला निघालो... कबीर खान दिग्दर्शित या चित्रपटात रणवीर सिंह कपिलच्या भूमिकेत दिसणार आहे, तर मदनलाल यांचे पात्र हार्डी संधू आणि मोहिंदर अमरनाथच्या भूमिकेत साकिब सलीम असतील. चित्रपट पुढच्या वर्षी १० एप्रिल रेाजी रिलीज होईल. 

 

 

फिल्ममध्ये या स्टार्सच्या आहेत महत्वाच्या भूमिका... 
1983 च्या क्रिकेट वर्ल्डकपवर बेस्ड या फिल्ममध्ये ताहिर राज भसीन सुनील गावस्कर, एमी ब्रिक बलविंदर संधू, तामिळ अभिनेता जीवा कृष्णामचारी श्रीकांत, चिराग पाटील, संदीप पाटील, आदिनाथ कोठारे, दिलीप वेंगसरकर, धैर्य करवा, रवि शास्त्री आणि साहिल खट्टर सैयद हे कलाकार दिसणार आहेत. कबीर खानच्या डायरेक्शनमध्ये बनत असलेल्या या फिल्मचे पहिले शेड्यूल ग्लासगो, स्कॉटलँडमध्ये शूट होईल.