आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Ranveer Singh Baraat In Seaplane Reached In Wedding Venue For Bride Deepika Padukone

प्लेनने वरात घेऊन आपल्या नवरीजवळ पोहोचला रणवीर, ग्रँड एंट्रीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई. 14 नोव्हेंबरला दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंहने कोंकणी पध्दतीने लग्न केले आहे. आज ते दोघंही सिंधी पध्दतीने लग्न करतील. सिंधी लग्नाच्या विधी सुरु झाल्या आहेत. आपली नवरी दीपिकाला घेण्यासाठी रणवीर वरात घेऊन पोहोचला. इटलीमध्ये होणा-या लग्नातून एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये रणवीरचा सी-प्लेन स्पष्ट दिसतोय. नवरदेव बनलेल्या रणवीरने घोड्यावर स्वार होऊन नाही तर सी-प्लेनमध्ये बसून वेन्यूवर एंट्री घेतली.

रिपोर्ट्सनुसार 14 सीटर सी-प्लेनमध्ये त्याची फॅमिली आणि फ्रेंड्स सहभागी होते. हा व्हिडिओ खुप दुरुन घेतला असल्यामुळे क्लिअर नाही. लग्नाचा एकही क्लिअर फोटो अजून समोर आलेला नाही. अशा वेळी सोशल मीडियावर दीपवीरचे चाहते खुप नाराज झाले आहेत. "एवढे सीक्रेट लग्न ठेवले, असे कोणते VVIP गेस्ट येत आहेत, हे काय एलियनचे लग्न आहे का?" अशा प्रकारचे अनेक कमेंट करुन यूजर्स आपली नाराजी व्यक्त करत आहेत.


मोबाइल फोन बॅन असल्यामुळे आले नाहीत फोटोज 
- लग्नातून कोणताही फोटो क्लिक होऊ नये असे दीपवीरने पहिलेच ठरवले होते. दोघांनी लग्नाच्या वेन्यूच्या सुरक्षेसाठी 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसे खर्च केले.
- रिपोर्ट्सनुसार वेडिंग वेन्यू Villa Balbianello च्या आजुबाजूला मोटर बोट्सवर कॅमेरा लावून सिक्योरिटी गार्ड्स तैनात करण्यात आले.
- एवढा कटेकोट बंदोबस्त ठेवूनही लग्नाचे फक्त व्हिडिओज नाही तर फोटोजही लीक झाले आहे. पण कोणताही क्लिअर फोटो अजून समोर आलेला नाही.
- दीपवीरच्या लग्नासंबंधीत एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये दोघंही मीडियापासून बचाव करण्यासाठी आपला वेडिंग लूक छत्रीमागे लपवत आहेत. तिथे उपस्थित असणारे पाहुणेही दीपिका-रणवीरला छत्रीमागे लपवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.
- लग्न प्रायव्हेट असावे या उद्देशाने पाहुण्यांना फोन न वापरण्याची अपील करण्यात आली होती. पाहुण्यांच्या मोबाइल कॅमेरावर स्टिकर लावण्यात आले आहेत, असेही वृत्त आले होते.

 

दीपिकाच्या भावाने केले रणवीरच्या फॅमिलीचे स्वागत 
- दीपिकाचा कजिन अमित पदुकोण बहिणीच्या लग्नामुळे खुप आनंदी आहे. अमितने सोशल मीडियावर एक स्पेशल मॅसेज पोस्ट केला.
- अमितने लिहिले आहे की, "हा एक आजुई आठवडा आहे, पुर्णपणे प्रेमात बुडालेला. तुम्ही दोघं सुंदर आणि नितळ मनाच्या व्यक्तींचे मिलन एखाद्या परिकथेप्रमाणे आहे. रणवीर तुझे कुटूंबात स्वागत आहे. कुटूंबात सर्वात फिल्मी असण्याचे स्थान तु माझ्याकडून हिरावून घेतले. चला मी सहन करुन घेईल. दीपिका मी तुला एवढे आनंदी कधीच पाहिले नाही आणि तु यापेक्षा कमी आनंदी राहूही नये."

 

 

Magical week, steeped purely in love. Fairy-tale union of the two most kind, beautiful souls. @RanveerOfficial Welcome to the fam! you've dethroned me as filmiest, but I'll cope 😉🤗 @deepikapadukone Never seen you happier; you deserve no less! 😘 #ladkiwale #DeepVeerKiShaadi pic.twitter.com/RaT86A9QXw

— Amit Padukone (@APadukone) November 14, 2018
लग्नानंतर होणार ग्रँड रिसेप्शन 
- इटलीमध्ये ग्रँड लग्नानंतर दीपवीरचे मुंबईमध्ये 28 नोव्हेंबरला ग्रँड रिसेप्शन होईल. रिसेप्शन रात्री 8 वाजता सुरु होईल. हे रिसेप्शन रणवीरचे पालक होस्ट करत आहेत.
- तर 21 नोव्हेंबरला दीपिकाचे होमटाउन बेंगलुरुमध्ये रिसेप्शन होईल. हे रिसेप्शन दीपिकाचे पालक होस्ट करत आहेत.
- रणवीर आणि दीपिकाचे रिसेप्शन कार्ड सामान्य कार्ड्सच्या तुलनेत वेगळे आणि हायटेक आहे. या कार्डवर स्पष्ट लिहिले आहे की, रिसेप्शनवर येणा-या पाहुण्यांना आपल्या मोबाइलवर या कार्डचा 'ई-इन्वाइट' घेऊन यावे लागेल. सिक्योरिटी लक्षात घेऊन, एंट्री करताना सर्व पाहूण्यांना ई-इनवाइटवरील कोड स्कॅन करुनच आतमध्ये घेतले जाईल.

 

 

बातम्या आणखी आहेत...