आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवू़ड डेस्कः रणवीर सिंहचा पदार्पणाचा चित्रपट 'बँड बाजा बारात'ला 9 वर्षे पूर्ण झाली आहेत. याप्रसंगी रणवीरने सोशल मीडियावर चित्रपटाचे सुरुवातीचेे दृश्य शेअर करत लिहिले, 'हे एक स्वप्न होते. त्या दिवसाला 9 वर्षे पूर्ण झाली आहेत.' रणवीर सिंह आणि अनुष्का शर्मा अभिनीत हा चित्रपट 10 डिसेंबर 2010 रोजी रिलीज झाला होता.
रणवीर सिंह आणि अनुष्का शर्माची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट मनीष शर्मा यांनी दिग्दर्शित केला होता. तसेच त्याने सुमारे 51.42 कोटी रुपयांची कमाई केली होती. हा चित्रपट एवढा यशस्वी ठरला की, 2014 मध्ये याचा तामिळ 'अहा कल्याणम' आणि 2013 मध्ये याचा तेलुगू रिमेक 'जबरदस्त' बनला.
रणवीरच्या आगामी चित्रपटांविषयी सांगायचे म्हणजे सध्या क्रिकेट वर्ल्डकपच्या विजयावर बनत असलेल्या 83 आणि जयेशभाई जोरदार या चित्रपटांचे शूटिंग करत आहेच 83 मध्ये त्याच्यासोबत दीपिका पदुकोण झळकणार आहे. चित्रपटात रणवीर कपिल देवची तर दीपिका त्याच्या पत्नीची भूमिका वठवणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.