आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'सुपर डान्सर चॅप्टर 3' च्या सेटवर मुलांचा परफॉर्मेंस पाहून रणवीरला अश्रू झाले अनावर, हमसून हमसून रडला, आलिया भटने सावरले 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई. रणवीर सिंह हा 'सुपर डान्सर चॅप्टर 3' या रिअॅलिटी शोच्या सेटवर भावूक झाला. लहान-लहान मुलांनी त्याचा पुर्ण सिनेमॅटिक प्रवास स्पेशल परफॉर्मेंस देऊन दाखवला आणि त्याला अश्रू अनावर झाले. परफॉर्मेंस पाहून त्याच्या डोळ्यांना अश्रू आले. रणवीर या शोमध्ये आलिया भटसोबत 'गली बॉय' चित्रपटाचे प्रमोशन करण्याचा आला होता. 14 फेब्रुवरीला हा चित्रपट रिलीज होतोय. 

 

हा ड्रामा जसजसा पुढे जात होता, रणवीर भावूक होत होता 
- शोदरम्यान मुलांनी रणवीर सिंह आणि सोनाक्षी सिन्हाच्या 'लुटेरा' चित्रपटातील गाणे 'जिंदा हूं यार' वर परफॉर्म केला. रणवीर सिंहच्या स्वागतासाठी हा परफॉर्मेंस होता. या गाण्यावर डान्स करत मुलांनी बालपणी रणवीरचे चित्रपटासाठीचे वेड, नंतर शिक्षणासाठी अमेरिकेत जाणे, तिथून परतल्यानंतर मुंबईत अॅक्टर बनण्यासाठी केलेला संघर्ष आणि त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचे वळण नाटकाच्या माध्यमातून दाखवले. हा ड्रामा जसजसा पुढे जात होता रणवीर सिंह भावूक होत होता. त्याचा हा प्रवास पाहून त्याला अश्रू अनावर झाले. 

 

हमसून हमसून रडला तर थांबवावी लागली शूटिंग 
- काही मीडिया रिपोर्ट्समध्ये तो सेटवर हमसून हमसून रडला असे बोलले जातेय. हे पाहून सेटवर शांतता पसरली. आलिया भट आणि सेटवरील उपस्थितांनी त्याला कसेतरी नॉर्मल केले. या काळात थोडावेळासाठी शूटिंग थांबवावी लागली. नॉर्मल झाल्यानंतर रणवीर त्याच्या खुर्चीवरुन उठला आणि मुलांमध्ये जाऊन त्यांना मिठी मारली. खरंतर रणवीर सिंह सोनम कपूरचा कजिन आहे. रणवीरची आई अंजू भवनानी सोनमची आई सुनीता कपूरची बहीण आहे.  या नात्याने सोनम-रणवीर भाऊ-बहीण आहे. अनिल कपूर आणि सोनम कपूरसारख्या स्टार्सशी संबंध असतानाही रणवीरला पहिला ब्रेक मिळवण्यासाठी 3 वर्षे स्ट्रगल करावा लागला होता. अॅक्टर म्हणून करिअरची सुरुवात करण्यापुर्वी त्याला एका जाहिरात कंपनीत कॉपी एडिटरच्या पदावर काम करावे लागले. 3 वर्ष कठोर परिश्रम घेतल्यानंतर रणवीरला प्रोड्यूसर आदित्य चोप्राच्या 'बँड बाजा बारात' चित्रपटाची ऑफर मिळाली तर तो इमोशनल झाला होता. ऑफर मिळाल्यानंतर तो बाजूला जाऊन खुप रडला होता असेही बोलले जाते. 


 

बातम्या आणखी आहेत...