आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Ranveer Singh Busy In Looking Wife Deepika Padukone Second Reception Of DeepVeer

पतीला इशा-याने काही तरी दाखवत होती दीपिका, पण रणवीरची पत्नीवरुन हटतच नव्हती नजर, एक्साइटमेंटमध्ये स्टेजवर थिरकू लागला रणवीर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः अभिनेता रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण यांच्या लग्नाचे दुसरे रिसेप्शन मुंबईतील ग्रॅण्ड ह्यात हॉटेलमध्ये पार पडले. बुधवारी रात्री झालेल्या या रिसेप्शनचे काही फोटोज समोर आले आहेत. समोर आलेल्या एका फोटोत दीपिका पती रणवीरला इशा-याने काही तरी दाखवण्याचा प्रयत्न करतेय, पण रणवीरची पत्नीवरुन नजरच हटत नाहीये. रणवीरची नजर दीपिकाच्या सौंदर्यावर खिळून होती.

 

1 डिसेंबर रोजी होणार तिसरे रिसेप्शन...
- दीपवीर त्यांच्या लग्नाच्या दुस-या रिसेप्शनमध्ये मॅचिंग आऊटफिटमध्ये दिसली. दोघांनी व्हाइट गोल्डन कलरचे आऊटफिट परिधान केले होते. दीपिकाने साडीसोबत हेवी गोल्डन जरी वर्कची लांब ओढणी डोक्यावर घेतली होती. शिवाय तिने हेवी नेकलेस आणि हेवी इअरिंग्स घातले होते.


- रिसेप्शनमध्ये रणवीर आणि दीपिका पूर्ण वेळ एकमेकांचा हात हातात पकडून होते. इतकेच नाही तर दोघे एकमेकांसोबत बोलण्यात बिझी होते. बोलता बोलता रणवीरने दीपिकाच्या हाताचे चुंबन घेतले, तेव्हा दीपिका लाजताना दिसली.


- दीपवीरचे आणखी एक रिसेप्शन येत्या 1 डिसेंबर रोजी मुंबईत आयोजित करण्यात आले आहे. हे रिसेप्शनल हॉटेल ग्रॅण्ड ह्यात येथेच पार पडणार आहे. या रिसेप्शनची थीम ब्लॅक ठेवण्यात आली असून या पार्टीत बॉलिवूड सेलिब्रिटी सहभागी होणार आहेत.


क्रीम आणि ब्लॅक कलरच्या आऊटफिटमध्ये दिसली दीपवीरची फॅमिली...
रिसेप्शनमध्ये दीपिका-रणवीरचे कुटुंबीय वेगवेगळ्या कलरच्या आऊटफिटमध्ये दिसली. एकीकडे दीपिकाचे फॅमिली मेंबर्स क्रीम कलरच्या आऊटफिटमध्ये दिसली. दीपिकाची आई उज्वला, वडील प्रकाश पदुकोण आणि बहीण अनीशा क्रीम कलरच्या ड्रेसेसमध्ये दिसले. तर दुसरीकडे रणवीरचे वडील जगजीत सिंह भवनानी, आई अंजू आणि बहीण रीतिका ब्लॅक कलरच्या ड्रेसमध्ये दिसले.


पुढील स्लाईड्सवर बघा, दीपवीरच्या वेडिंग रिसेप्शनचे खास फोटोज...  

बातम्या आणखी आहेत...