आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Ranveer Singh Buys SUV Lamborghini Urus, Car On Road Price In Mumbai Is 3.42 Crore

रणवीर सिंहने खरेदी केली एसयूव्ही लॅम्बोर्गिनी यूरस, मुंबईमध्ये कारची ऑन रोड किंमत 3.42 कोटी 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : रणवीर सिंह गुरुवारी मुंबईच्या रस्त्यावर लाल रंगाची लॅम्बोर्गिनी यूरस चालवताना दिसला. रिपोर्ट्सनुसार, त्याने अशातच ही कार खरेदी केली आहे. मात्र कारवर पर्मनंट रजिस्ट्रेशन नंबर नव्हता आणि रणवीर पहिल्यांदा ती ड्राइव्ह करत होता. मुंबईमध्ये या सुपर स्पोर्ट्स यूटिलिटी व्हेहिकल (एसयूवी) ची एक्स-शोरूम आणि ऑन रोड किंमत अनुक्रमे सुमारे 3.10 कोटी आणि सुमारे 3.42 कोर्टी रुपये आहे. ही जगातील सर्वात फास्ट एसयूव्हीजपैकी एक असल्याचे सांगितले जात आहे. ही कार 3.6 सेकंदात 0-100 किमी. प्रति तासाची स्पीड पकडते.  

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे तर शेवटचे रणवीर 'गली बॉय' मध्ये दिसला होता, ज्यामुळे अशातच बेस्ट इंटरनॅशनल फीचर फिल्मच्या कॅटॅगरीमध्ये ऑस्करसाठी निवडला गेला. रणवीर सध्या '83' च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. 1983 च्या क्रिकेट वर्ल्डकपवर बेस्ड या चित्रपटात रणवीर कपिल देवच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन कबीर खान करत आहे. रणवीर सिंहची पत्नी आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण चित्रपट '83' मध्येदेखील पत्नी (रोमी देवी) च्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट 10 एप्रिल 2020 ला रिलीज होईल.