आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'सिम्बा' बद्दलचे पब्लिक रिएक्शन जाणून घेण्यासाठी पब्लिकमध्ये आला रणवीर, सिनेमाहॉलच्या छतावर चढून केला जबरदस्त डान्स, क्रेझी फॅन्सने टाळ्यांनी आणि शिट्यांनी केले चीयर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : रणवीर सिंह आणि सारा अली खान स्टारर 'सिम्बा' 28 डिसेंबरला रिलीज झाला. फिल्मला बॉक्सऑफिसवर धमाकेदार ओपनिंग मिळाली आहे. पहिल्याच दिवशी फिल्मने 22 कोटी रुपयांपेक्षा जास्तच कलेक्शन केले. या फिल्मसाठी रणवीर खूप एक्साइटेड आहे. शुक्रवारी तो पब्लिक रिएक्शन जाणून घेण्यासाठी मुंबईत एका थिएटरमध्ये पोहोचला. तिथे त्याने सिनेमा हॉलच्या छतावर चढून जबरदस्त डान्स केला. फॅन्ससुद्धा त्याचा बिनधास्तपणा पाहून एकदम क्रेझी झाले. चारही बाजूंनी 'बाबा-बाबा' असे आवाज येत होते. लोक शिट्या आणि टाळ्या वाजवून रणवीरला चीयर करत होते. रणवीरही छतावरून त्यांचे अभिवादन स्वीकार करत होता. 

 

रणवीरने फॅन्सला Kiss सुद्धा केले... 
रणवीर सिनेमाहॉलच्या बाहेर असलेल्या फॅन्समध्ये गेला. तिथे तो अगदी मोकळ्या मानाने सर्वांना भेटला. यादरम्यान तो कधी एखाद्या फॅनला Kiss करताना दिसला तर कधी काही फॅन्ससोबत सेल्फी काढतानांही दिसला. 'सिम्बा' चित्रपट रोहित शेट्टीने डायरेक्ट केला आणि पहिल्यांदाच या चित्रपटात तो आणि रणवीर सोबत काम करत आहेत. फिल्ममध्ये रणवीर व्यतिरिक्त सारा अली खान, अजय देवगन, सोनू सूद, आशुतोष राणा, सिद्धार्थ जाधव, सुचित्रा बांदेकर, अश्विनी कळसेकर यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत. अक्षय कुमारनेही फिल्ममध्ये कैमियो केला आहे.  

बातम्या आणखी आहेत...